शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘झीरो बजेट’ शेतीला ‘पद्मश्री’चे कोंदण!

By admin | Updated: January 26, 2016 03:14 IST

झीरो बजेट अर्थात नैसर्गिक शेतीचे प्रणेते असणारे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील शेतकरी सुभाष पाळेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे

योगेश बिडवई,मुंबईझीरो बजेट अर्थात नैसर्गिक शेतीचे प्रणेते असणारे अमरावती जिल्ह्यातील बेलोरा येथील शेतकरी सुभाष पाळेकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पाळेकर यांना पुरस्कार देऊन केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या विरोधातील विषमुक्त कृषी चळवळीचा गौरव केल्याचे मानले जात आहे. रासायनिक खतांमुळे शेतीवर वाढलेला खर्च व नापिकीमुळे विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडत असताना पाळेकर यांनी मात्र कमी खर्चात शेती करण्याचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे तारणहार ठरले आहेत. कृषी पदवीधर (बी. एससी. अ‍ॅग्रीकल्चर) असलेल्या पाळेकर यांनी राज्यातील हजारो शेतकऱ्यांना निशुल्क नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. ते महिन्यातील २५ दिवस शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बाहेर असतात. २५ वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रम आहे. एक दिवसापासून ते आठवडाभराचे प्रशिक्षण शिबीर ते घेतात. १९४९ मध्ये जन्मलेल्या पाळेकर यांच्यावर विनोबा भावेंचा मोठा प्रभाव आहे. विनोबांच्या सहवासात आल्यानंतर ते निसर्गाकडे अधिक ओढले गेले. कृषी पदवी घेतल्यानंतर पाळेकर हे त्यांच्या ४० एकर शेतीत रासायनिक खतांचा वापर करून अधिक उत्पन्न घेऊ लागले. १९७३ पासून सुरू झालेल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे १९८५ नंतर मात्र त्यांच्या शेतातील उत्पन्न घटले, त्यातून ते जागे झाले आणि नैसर्गिक शेतीकडे वळले. त्यांनी गौंड आदिवासींच्या शेतीचा अभ्यास केला, त्यातून त्यांना निसर्ग समजला. त्यानंतर ते देशी गाईचे शेण व गोमूत्र यांचा वापर करून शेती करू लागले. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. स्वअनुभवातून त्यांनी नंतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करणे सुरू केले. पाळकेरांना पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे ६ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ते शिबिरात होते. या शिबिरात आंध्रचे उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, दोन हजार कृषी अधिकारीसुद्धा सहभागी झाले आहेत. पाच दिवस हे शिबीर चालणार आहेत. त्याला मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांनी कर्नाटक, तामिळनाडू, केरळ येथेही शिबिरे घेतली आहेत. राज्य सरकारकडून उपेक्षाआंध्र प्रदेश सरकारनेही त्यांचे शिबीर आयोजित केले असताना महाराष्ट्र सरकारकडून मात्र त्यांची उपेक्षा झाली आहे. विशेष म्हणजे राज्यातील कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनीही त्यांच्या चळवळीला कायम विरोध केला. कृषी अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाची दखल घेतली नाही. कर्नाटकचा पुरस्कारकर्नाटक राज्यात पाळेकर यांच्या कामाची दखल घेण्यात आली. २००५ मध्ये त्यांना चित्रदुर्गस्थित मठाकडून बसवश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००६ मध्ये त्यांना कर्नाटक राज्य रयत संघातर्फे भारत कृषक रत्न सन्मान देण्यात आला.