शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत बंदीजनांच्या श्रमातून फुलली धान शेती

By admin | Updated: November 11, 2016 19:10 IST

कारागृह म्हटले की गुन्हेगारांचे स्वतंत्र गाव, असे चित्र समोर येते. मात्र, या गावातही कष्टकरी, श्रमकरी व शेती करण्याचे गुण अंगी असलेल्या व्यक्ती वास्तव्यास आहेत.

ऑनलाइन लोकमत/गणेश वासनिक

अमरावती, दि. 11 - कारागृह म्हटले की गुन्हेगारांचे स्वतंत्र गाव, असे चित्र समोर येते. मात्र, या गावातही कष्टकरी, श्रमकरी व शेती करण्याचे गुण अंगी असलेल्या व्यक्ती वास्तव्यास आहेत. परिणामी अमरावतीच्या काळ्या मातीत पहिल्यांदाच धान शेतीचा प्रयोग यशस्वी करण्याची किमया खुल्या कारागृहातील बंदीजनांनी केली आहे. तीन एकर परिसरात धानाचे भरघोस उत्पादन घेऊन ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, प्रयत्न करा, यश नक्कीच मिळेल’ असा संदेश बंदीजनांनी दिला आहे.विदर्भात धानशेती प्रामुख्याने गोंदिया, भंडारा, गडचिरोली आदी पूर्व भागातील जिल्ह्यांमध्ये केली जाते. अमरावती जिल्ह्यात धानशेतीसाठी योग्य जमीन व पोषक वातावरण नाही. त्यामुळे कोणताही शेतकरी धान शेती करण्याचे धाडस करीत नाही. मात्र, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकाराने एचएमटी वाण धानाची रोपलागवड तीन एकरांत करण्यात आली. धानशेतीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींची पूर्तता बंद्यांच्या हातून करण्यात आली. धानशेतीसाठी पाणीपुरवठ्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. परिणामी ९० दिवसांत धानशेतीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रतिएकर २० क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. धानशेतीच्या यशस्वी प्रयोगामुळे बंदीजनांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्याचे हे संकेत मानले जात आहेत. धानशेती करण्यासाठी खुल्या कारागृहातील २० कैद्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. कारागृहात सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत कैद्यांमध्ये माणूसपण रूजविताना त्यांच्यात समाजाप्रती आदर, सन्मान निर्माण करण्याचे कार्य कारागृह प्रशासनाला करावे लागते. इतकेच नव्हे तर बंद्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबवावे लागतात. मागील काही महिन्यांपासून अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी बंदीजनांना रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. धानशेतीचा प्रयोग हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित म्हणून न्यायालयाच्या आदेशानुसार कैदी चार भिंतींच्या आत शिक्षा भोगत आहेत. हे कैदी समाजाच्या नजरेत गुन्हेगार आहे. मात्र, ज्या हातांनी गुन्हे घडले तेच हात रोजगार निर्मितीच्या दिशेने वाटचाल करूलागल्याचे चित्र अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात अनुभवता येत आहे. धानशेतीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ तुरूंगाधिकारी अशोक जाधव, तुरूंगाधिकारी शरद माळशिकारे, मोहन चव्हाण, गजानन क्षीरसागर, पांडुरंग भुसारे, वासुदेव सांळुके, रामदास बोंडे, कृषी सहायक गणेश भापकर, सांस्कृतिक विभागप्रमुख भूषण कांबळे प्रयत्नरत आहेत. एचएमटी धानाचे उत्पादन घेण्यात आले आहे. अमरावतीत हा प्रयोग यशस्वी होईल का? याबाबत साशंकता होती. परंतु नावीण्यपूर्ण प्रयोग करण्याच्या अनुषंगाने तीन एकरांत धानाच्या रोपांची लागवड करण्यात आली. बंदीजनांनी अतिशय परिश्रम घेतले. १२० किलो बियाण्यांतून सुमारे ६० क्विंटल धानाचे उत्पादन होईल, अशी शक्यता आहे.- भाईदास ढोले,अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावतीबाजारपेठेत एचएमटी तांदूळविक्रीचा मानसअमरावतीच्या मध्यवर्ती खुले कारागृहात बंदीजनांच्या परिश्रमातून एचएमटी वाणाचे धान उत्पादन घेण्यात आले आहे. लवकरच उत्पादित धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार केला जाईल. एचएमटी तांदळाला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने कारागृहाच्या उत्पन्नवाढीसाठी ते विकले जाईल, असे संकेत अधीक्षक ढोले यांनी दिले आहेत. नियमानुसार शेतीकामाचे वेतनसुद्धा बंदीजनांच्या खात्यात जमा होणार आहेत.