शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गूळ उत्पादकच होणार आता ‘मालक’

By admin | Updated: May 16, 2017 01:27 IST

बाजार समिती : ‘पणन’च्या नवीन कायद्याचा परिणाम; सुमारे तीस हजार गूळ उत्पादक

राजाराम लोंढे ।  लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सात-बारा नावावर असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बाजार समित्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा कायदा पणन विभागाने आणला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर जमिनीबरोबर तो समितीला शेतीमालाचा पुरवठाधारक असणे बंधनकारक आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न समितीत सुमारे तीस हजार गूळ उत्पादक शेतकऱ्यांची संख्या असल्याने आगामी निवडणुकीनंतर येथे गूळ उत्पादकच मालक होणार हे मात्र निश्चित आहे. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून बाजार समित्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात बहुतांशी बाजार समित्या असल्याने हा अंकुश ठेवला, हा राजकीय अर्थ बाजूला ठेवल्यास या सरकारने काही निर्णय चांगले घेतले आहेत. अडतीमधून शेतकऱ्यांना मुक्त केलेच, पण त्याबरोबर भाजीपाला, फळे नियमनमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय पणन विभागाने घेतल्याने समित्यांमधील शोषणाला बऱ्यापैकी लगाम लागल्याचे चित्र राज्यात पाहावयास मिळत आहे. विकास संस्थांवर ज्यांचे प्रभूत्व, त्यांचीच बाजार समितीवर सत्ता येते. विकास संस्थांचे संचालकच समितीचे कारभारी होतात. याऐवजी शेतीमाल उत्पादकांना मतदानाचा अधिकार द्यायचा म्हणजे शेतकऱ्यांची नेमकी दुखणे त्यांना कळतील. यासाठी पणन विभागाने सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे; पण सात-बारा नावावर असून चालणार नाही, तर त्या शेतकऱ्याने समितीला उत्पादित केलेला शेतीमाल पुरविला पाहिजे. सध्या कोल्हापूर बाजार समितीमधील मालाची आवक पाहता, गूळ मोठ्या प्रमाणात आवक होते, भाजीपाल्याची आवक फार कमी होते, दोन हजार शेतकरी भाजीपाला पुरवठा करतात. त्यामुळे नवीन कायद्यानुसार निवडणूक घ्यायची म्हटले तर गूळ उत्पादक शेतकरीच कारभारी होणार आहेत.ग्रामपंचायत गटही जाणारगेली अनेक वर्षे बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर ग्रामपंचायत सदस्यांमधून चार प्रतिनिधी निवडून येत होते. वास्तविक या गटाचा समित्यांच्या कारभाराशी थेट संबंध नसतानाही त्यांचे वर्चस्व राहिले; पण नवीन कायद्यानुसार या गटाबरोबरच पणन प्रक्रिया संस्था गट जाणार असून, या जागा उत्पादक शेतकरी गटात समाविष्ट केल्या जाणार आहेत.बोगस नोंदीची पळवाट !शेतीमाल उत्पादित न करता परजिल्ह्यांतून येणारा भाजीपाला नावावर नोंद करून निवडणुकीसाठी पात्र होण्याची पळवाट आहे. त्याचा वापर मोठ्या प्रमाणातही होऊ शकते, याला पणन विभाग कसा लगाम लावतो, त्यावरच नवीन कायद्याचे फलित अवलंबून आहे. कायद्यातील बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. शेतात राबणारा खरा शेतकरी संचालक मंडळात गेल्याने शेतीमालाच्या दराचे बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागू शकतात. - सर्जेराव पाटील (शेतकरी, गडमुडशिंगी) सध्याचे संचालक मंडळ विकास संस्था-११ पैकी ७ सर्वसाधारण, २ महिला, १ इतर मागासवर्गीय, १ भटक्या विमुक्त जाती/जमाती.ग्रामपंचायत-४ पैकी २ सर्वसाधारण, १ अनुसूचित जाती/जमाती, १ आर्थिकदृष्ट्या दुर्बल. व्यापारी प्रतिनिधी-२हमाल-तोलाईदार प्रतिनिधी-१पणन प्रक्रिया प्रतिनिधी-१