शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी सुरक्षा सायडिंगला

By admin | Updated: August 25, 2014 03:36 IST

मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे या दोघांच्या सीमांसंदर्भात कोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच असणाऱ्या समस्यांवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कधीही गांभीर्याने विचार केला नाही.

जयंत धुळप, अलिबागमध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे या दोघांच्या सीमांसंदर्भात कोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच असणाऱ्या समस्यांवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कधीही गांभीर्याने विचार केला नाही. कोकण रेल्वे पोलीस दल आणि कोकण रेल्वे आपत्ती नियंत्रण यंत्रणा अस्तित्वातच आली नसल्याने गेल्या तब्बल ११ वर्षांच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर तीन गंभीर अपघात झाले होते. रेल्वे अपघातात एकूण ९० प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत, तर ४००च्या वर प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कोकणातील जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासनांकडून ‘जिल्हा आपत्ती निवारण आराखडा’ तयार करण्याच्या प्रक्रियेकरिता सातत्याने बोलावून देखील ते कधीही येत नाहीत व सहकार्य देखील करीत नाहीत, ज्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रेल्वे अपघात आपत्ती नियंत्रण योजना देखील कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून अस्तित्वात येऊ शकलेली नाही. मुळात मध्य आणि कोकण रेल्वे हद्दीबाबत मोठा वाद आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने सातत्याने प्रवासी सुरक्षा साइड ट्रॅकला पडत असल्याचे दिसून येते.