शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परदेश वाऱ्यांची हद्द झाली

By admin | Updated: April 10, 2015 04:04 IST

सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश वाऱ्यांचा सपाटा लावला आहे. परदेश वाऱ्या करायच्या किती? याला तारतम्य नाही.

सोलापूर : सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश वाऱ्यांचा सपाटा लावला आहे. परदेश वाऱ्या करायच्या किती? याला तारतम्य नाही. १० वर्षांत आघाडी सरकारच्या पंतप्रधानांनी केल्या नाहीत तेवढ्या परदेश वाऱ्या अवघ्या १० महिन्यांत मोदींनी केल्या. यातून काय साध्य झाले, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी उपस्थित केला. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीची गुरुवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली़ या वेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका करीत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. अच्छे दिन येण्याची स्वप्नं सामान्य माणूस पाहतोय. मात्र, सध्या केंद्र सरकारचे धोरण पाहता सर्वांचा भ्रमनिरास झाला आहे. नरसिंहरावांच्या काळात आर्थिक पुनरुज्जीवनाचा पाया घातला गेला. डॉ. मनमोहन सिंगांनी देशाची अर्थव्यवस्था बळकट केली. काँग्रेसच्या धोरणांमुळेच देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. आता विकासाला पैसा नसल्याची ओरड होत आहे. कुठे गेला हा पैसा, असा सवाल करीत शिंदे यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले. अणुकराराला विरोध करणाऱ्यांनीच अमेरिकन अध्यक्षांच्या समवेत त्याच करारावर थाटात सह्या केल्या, अशी खिल्ली त्यांनी उडवली. (प्रतिनिधी)