शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आगीमुळे एमटीएनएल सेवेचा बोजवारा

By admin | Updated: January 20, 2017 05:08 IST

टेलिफोन केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरातील एमटीएनएल सेवा दिवसभर विस्कळीत झाली.

मुंबई : वरळी येथील टेलिफोन केंद्राच्या कार्यालयात गुरुवारी सकाळी आग लागून झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरातील एमटीएनएल सेवा दिवसभर विस्कळीत झाली. एमटीएनएलच्या इंटरनेट सेवेसह दूरध्वनी सेवेवर याचा विपरीत परिणाम झाला. परिणामी वरळी परिसरातील विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट मुख्यालयांसह एमटीएनएलच्या रहिवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना याचा मोठा फटका बसला. सायंकाळी पाचनंतर सेवा पूर्ववत झाल्याचा दावा एमटीएनएलने केला. प्रत्यक्षात मात्र वरळीसह उर्वरित परिसरातील टेलिफोन आणि इंटरनेट सेवांचा रात्री उशिरापर्यंत बोजवारा उडाल्याचे चित्र होते. वरळी येथील टेलिफोन एक्सचेंजच्या कार्यालयात गुरुवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग खूप मोठी नसली तरी या आगीत एमटीएनएलच्या यंत्रणेची हानी झाली. वरळी एक्सचेंजलगतच्या परिसरासह गांधीनगर, वरळी नाका आणि लक्ष्मी पपन मार्गावरील टेलिफोन सेवेसह नेटसेवा ठप्प झाली होती. एमटीएनएलची यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सायंकाळ उजाडल्याने वरळीतल्या बहुतांशी कॉर्पोरेट मुख्यालयांसह उर्वरित कार्यालयांना याचा मोठा फटका बसला. सकाळपासून दुपारी ही सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली असतानाच दुपारी चारनंतर या दोन्ही सेवा पूर्ववत करण्यात आल्याचा दावा महानगर टेलिफोन निगम लिमिटेडकडून करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र सायंकाळीही गांधीनगर, वरळी, वरळी नाक्यासह लगतच्या परिसरातील टेलिफोन सेवेत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत होत्या. ग्राहकांना झालेल्या मनस्तापाबद्दल एमटीएनएलने दिलगिरी व्यक्त करत ग्राहकांना सहकार्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)