ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेने निघालेल्या लोकलची ओव्हरहेड वायर दादर स्थानकाजवळ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आलेल्या लोकलची ओव्हरहेड वायर मंगळवारी सकाळी तुटली, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दादर स्थानकाजवळ अनेक लोकल्सची एकामागोमाग रांग लागल्याचे दिसत होते. त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील ( धिम्या मार्गावरील) वाहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर ( जलद मार्ग) वळवण्यात आल्याने फास्ट लोकल्सही काही काळ अडकून पडल्या होत्या,
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचा-यांनी बिघाड दुरूस्त करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. ऐन गर्दीच्या वेळेस हा खोळंबा झाल्याने स्थानकावरील गर्दी वाढू लागली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.