शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

कोकणात अतिवृष्टी, मराठवाडा कोरडाच

By admin | Updated: June 26, 2015 02:25 IST

मराठवाडा वगळता राज्यात सर्वदूर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी

पुणे : मराठवाडा वगळता राज्यात सर्वदूर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. विदर्भात पावसाचे प्रमाण कमी झाले, तर मराठवाडा गुरुवारीही कोरडाच होता. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाले आहेत. ते जमिनीच्या दिशेने सरकल्याने महाराष्ट्रात तुफान बरसणाऱ्या मान्सूनचे ढग तिकडे ओढले गेले आहेत. केवळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे.गेल्या २४ तासांत गगनबावडा येथे १३० मिमी, इगतपुरी १२०, पुणे-वेल्हा ११०, चंदगड ९०, महाबळेश्वर ८०, सावंतवाडी, आजरा ७०, राधानगरी ६०, चिपळूण, खालापूर, अकोले, पाटण, पुणे-मुळशी, सातारा, शाहूवाडी येथे ५०, कणकवली, कुडाळ, संगमेश्वर, पुणे-भोर, पन्हाळा, पुणे-वडगाव मावळ येथे ४०, कर्जत, माथेरान, पेण, राजापूर, शहापूर, वेंगुर्ला, गडहिंग्लज, शिराळा, साकोली येथे ३०, अंबरनाथ, भिवंडी, दापोली, गुहाघर, कल्याण, महाड, मालवण, माणगाव, पोलादपूर, रोहा, पाली, उल्हासनगर, पुणे-चिंचवड, कोल्हापूर, कराड, पुणे-राजगुरूनगर, सिन्नर, भंडारा येथे २०, अलिबाग, हर्णे, मुंबई, पनवेल, रत्नागिरी, ठाणे, उरण, पुणे-आंबेगाव, दिंडोरी, हातकणंगले, पुणे-जुन्नर, कोपरगाव, निफाड, ओझर, पुणे-पुरंदर, संगमनेर, वाई, इस्लामपूर, चिखलदरा, नागपूर येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.