शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद मिटवण्यासाठी महावीर, बुद्धांच्या मार्गावर चला

By admin | Updated: August 3, 2015 01:05 IST

दहशतवाद मिटवण्यासाठी महावीर आणि गौतम बुद्ध यांनी दाखवलेल्या मार्गावर चला, असे विचार लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि खासदार विजय दर्डा यांनी

मुंबई : दहशतवाद मिटवण्यासाठी महावीर आणि गौतम बुद्ध यांनी दाखवलेल्या मार्गावर चला, असे विचार लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. कफ परेड येथील विवांता हॉटेलमध्ये पार पडलेल्या प्रीती जैन यांच्या ‘निर्जरा भक्ती वृंद’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलते होते.दर्डा म्हणाले की जैन धर्मात जन्माला आलेला व्यक्ती जैन नसतो, तर जैन धर्माने दिलेल्या शिकवणीचे अनुकरण करणारा व्यक्ती खऱ्या अर्थाने जैन ठरतो. म्हणूनच दहशतवादाला विरोध करणारे आणि जगाला अहिंसा, शाकाहार आणि माणुसकीची शिकवण देणारे माजी राष्ट्रपतीएपीजे अब्दुल कलाम हे आचरणाने जैनच होते. प्रीती जैन यांनीलिहिलेल्या पुस्तकातून भक्ती आणि संगीताची सांगड घातली जाईलआणि त्यातून विचारांचे नवनिर्माण होईल, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भजन संकलनावर आधारित पुस्तकाचे कौतुक करताना त्यांनी सुस्वरात पूर्ण भजन गाऊन सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.त्या म्हणाल्या की मुंबईतील धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ भक्तीसाठी दिला पाहिजे. या पुस्तकात दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या भजनांचा समावेश केल्याने त्यांनी आनंदही व्यक्त केला. पुस्तकाच्या लेखिका प्रीती जैन नैनुतिया म्हणाल्या की, पुस्तकात जैन धर्मातील शिकवण आणि तत्त्वांचा समावेश केलेला आहे. मोक्षापर्यंत पोचण्याचा मार्ग याच माध्यमातून मिळतो. या पुस्तकाच्या निर्मितीचे श्रेय त्यांनी आई-वडिलांच्या संस्कारांना दिले. यावेळी प्रीती जैन यांच्या आई मधुर जैन व वडील सुरेंद्र कुमार जैन हे या कार्यक्रमासाठी खास मेरठवरून उपस्थित होते. कार्यक्रमावेळी सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांच्या पत्नी सोनाली यांनी दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या ‘महावीर नमन’ या सीडीतील भजनाचे गायन करीत सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तर ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्तानेज्येष्ठ संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी जोडीतील आनंदजी शहा यांनी दर्डा यांच्यासाठी ‘मेरा जीवन कोरा कागज...’ हे गीत गायले. तसेच गायक रूपकुमार राठोड आणि ज्येष्ठ कवी नारायण अग्रवाल दासनारायण यांनी या भजनाचेसंकलन असलेल्या पुस्तकाचे रूपांतर आॅडिओ रूपात करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात न्यायमूर्ती कमल तातेड, माहिती आयुक्त डी. के. जैन, माजी अतिरिक्त महासंचालक पी. के. जैन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नैनुतिया, माजी मुख्यसचिव जयंतकुमार बांठिया, जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष राकेश मेहता, ए. के. जैन, भाजपा उपाध्यक्ष किरीट भन्साली, वल्लभ भन्साली, जयेंद्र शहा,आशिष आणि संगीता जैन, राजीव श्रीश्रीमाळ, सुनीत आणि पूर्वा कोठारी, कांतीलाल कोठारी, अनुजा छाजेड, रिलायन्सचे आनंद जैन, उद्योगपती मोतीलाल ओस्वाल, उद्योगपतीसुभाष रुणवाल, कस्टम अ‍ॅन्ड सर्व्हिस टॅक्स चीफ कमिशनर सुशील सोलंकी यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)