शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींच्या डाटासाठी आऊटसोर्सिंग; अडीच कोटींचा खर्च : ११ महिन्यांसाठी ३० कर्मचारी-अधिकाऱ्यांची घेणार मदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 08:38 IST

आता राज्य मागासवर्गीय आयोगास ११ महिन्यांकरिता ३० कर्मचारी-अधिकारी यांची फौज बाह्ययंत्रणेद्वारे  घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांच्यावर अडीच कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले.

- नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य सरकारने सादर केलेल्या ओबीसींच्या अहवालात सखोल माहिती व शास्त्रीय आकडेवारीचा अभाव असल्याचे मत नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा ओबीसींचा अंतरिम अहवाल फेटाळून  ताशेरे ओढल्यानंतर जाग आलेल्या सरकारने आता ओबीसींचा डाटा गोळा करण्याचे काम जलद  गतीने आणि तो शासनाने दिलेल्या पद्धतीने होण्यासाठी अखेर खासगीकरणाचा आधार घेतला आहे. 

यानुसार आता राज्य मागासवर्गीय आयोगास ११ महिन्यांकरिता ३० कर्मचारी-अधिकारी यांची फौज बाह्ययंत्रणेद्वारे  घेण्यास मान्यता दिली आहे. त्यांच्यावर अडीच कोटी रुपये खर्च करणार असल्याचे सूत्रांनी  सांगितले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडचणीत आल्या आहेत. कारण राज्यातील १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या २८४ पंचायत समित्या, २०८ नगरपालिका, १४ नगरपंचायती व ८०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिल, मे महिन्यांत होणार आहेत. तेथे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी आरक्षण संकटात आले आहे. यामुळे ओबीसी नेत्यांची मर्जी राखण्यासाठी सर्वच पक्षांनी ओबीसींशिवाय निवडणुका नको, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मागासवर्गीय कल्याण विभागाने अखेर मागास आयोगास ३० कर्मचारी-अधिकारी बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास तातडीने मान्यता दिली आहे. या सर्वांना २० ते ६० हजारांपर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे. यापूर्वी मागास आयोगास कार्यालयीन खर्चासह  प्रवास आणि दूरध्वनी खर्चासाठी ८४ कोटी १८ लाख ६८ हजारांचा निधी दिला आहे.

सरकारवर कोणाचाही दबाव नाहीnसर्वोच्च न्यायालयाने ताशरे ओढल्यानंतर मागासवर्गीयांची मर्जी राखण्यासाठी ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. nयासंदर्भात आमच्यावर कोणाचा दबाव नसून, आम्ही त्याला भीकही घालत नाही. nआरक्षणासह निवडणुकांसाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर कायदा केला जाईल. nमंत्रिमंडळाची मान्यता घेऊन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. nत्यावेळी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या स्थगन प्रस्तावात  महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केली, मागासवर्ग आयोगाला लागणारा निधी, कर्मचारी दिले गेले नाहीत, असे आरोप केले होते. nयानंतर सरकारने तातडीने हे ३० कर्मचारी-अधिकारी बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिली आहे.

अर्ज मागविलेयाशिवाय सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर सदस्य सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी मंत्रालयातील उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून अर्ज मागविले आहेत.