शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गावपळणीसाठी शिराळे वेशीबाहेर

By admin | Updated: January 9, 2015 00:28 IST

वार्षिक उत्सव : शाळा भरते झाडाखाली; वास्तव्य राहुट्यांमध्ये

वैभववाडी : वार्षिक गावपळणीमुळे शिराळेवासीय सडुरे गावच्या हद्दीतील राहुट्यांमध्ये दाखल झाले आहेत. पुढील पाच दिवसांत ग्रामदेवता श्री गांगोचा कौल घेऊन ते पुन्हा शिराळेत परततील. या काळात निसर्गाशी समरस होऊन ज्ञानार्जनाचा अनुभव चिमुकली बालके घेणार आहेत.शिराळेच्या वार्षिक गावपळणीची परंपरा साडेचारशे वर्षांपासून चालत आली आहे. गावपळण हा ग्रामदेवतेचा आदेश मानून शिराळेवासीय मोठ्या श्रद्धेने दरवर्षी पाच ते सात दिवस गाव सोडतात. गावपळणीचा कौल होण्याआधीच सडुरेच्या हद्दीतील नेहमीच्या जागी झाडांच्या डहाळ्यांपासून राहुट्या उभारून ठेवतात. गावपळणीचा कौल होताच शिराळेचे ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात गाव सोडले आहे.शिराळे बनलेय सुने सुने गावपळणीला निघताना गुरेढोरे यांच्यासह शिराळेवासीय सुमारे ४ ते ५ किलोमीटर अंतर चालून सडुरेत दाखल झाले आहेत. गावात परतण्याचा कौल होईपर्यंत शिराळे गाव पुरते सुने सुने बनले आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार पाळीव प्राणीही शिराळेच्या हद्दीत फिरकत नाहीत. गावपळणीच्या दिवसात शिराळेवासीयांची दैनंदिनी राहुट्यांमधून सुरू असल्याचे दिसते. अगदी गुण्यागोविंदाने राहुट्यांमध्ये राहणाऱ्या शिराळेवासीयांच्या चेहऱ्यावर गावपळणीचा आनंद अक्षरश: ओसंडून वाहताना दिसतो.शाळा भरते झाडाखाली गावपळणीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली शिराळेची शाळा भरते. इतर दिवशी चार भिंतींमध्ये धडे गिरवत कवी कल्पनेतील निसर्ग समजावून घेणारी बालके गावपळणीच्या निमित्ताने निसर्गाशी समरस होऊन गेलेली दिसतात. प्रार्थना, पोषण आहार सारे काही झाडाखालीच होत असल्याने विद्यार्थीही उत्साही दिसतात.शिराळे हे महसूल गाव असून, ते वैभववाडी तालुक्यात आहे. दरवर्षी गावपळण होते. यापूर्वी एक महिना गावपळण होत होते; परंतु आता पाच दिवसांवर आला आहे.गावपळणीला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे. ग्रामस्थ, आबालवृद्धांनी श्रद्धेने मोठ्या उत्साहात यात सहभागी होतात.घोरीप खेळाने  होते सांगतावार्षिक गावपळणी पार पाडून गावात परतल्यावर मानकरी ग्रामदेवतेकडे कौल घेऊन नाडेघोरीप खेळाची तयारी करतात. त्यादिवशी संपूर्ण रात्र जागून पारंपरिक पद्धतीने नाडेघोरीप सादर करतात. तसेच या खेळानिमित्त गावकरी रात्रीचे सामूहिक भोजन करतात. त्यामुळे गावपळणीनंतरचे नाडेघोरीप हे शिराळेवासीयांसाठी पर्वणीच ठरते. हा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावचे लोकही शिराळेत जातात. नाडेघोरीप खेळ झाल्याखेरीज गावपळणीचे वार्षिक पूर्ण होत नाही, असा तेथील रयतेचा पूर्वापार समज आहे.