शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

कुटुंबातील वृद्धेचे मरणही ठरले बहिष्कृत

By admin | Updated: September 11, 2015 09:34 IST

लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध

नेर (यवतमाळ) : लग्न आणि मरण सोडू नये, अशी ग्रामीण माणसाची पक्की धारणा आहे. या दोन प्रसंगी शत्रूच्याही घरी गेलेच पाहिजे. पण गुरुवारी नेर तालुक्याच्या दगडधानोरा गावात एका वयोवृद्ध महिलेच्या अंत्ययात्रेला ३ हजार लोकसंख्येपैकी एकही माणूस फिरकला नाही. केवळ बाप-लेक अन् नातवाने काढलेली ही अंत्ययात्रा अख्ख्या जिल्ह्याला सुन्न करून गेली.गावाने एखाद्या घरावर बहिष्कार टाकण्याचा प्रकार साऱ्यांनाच ठाऊक आहे. दगडधानोरा गावात मात्र एका घरानेच संपूर्ण गावावर बहिष्कार टाकला आहे. या घटनेमागील अंतस्थ धागा शोधण्यासाठी कॅलेंडरची पाने उलटत ९ वर्षे मागे जावे लागले. २००६मध्ये गावातील एका व्यक्तीचा खून झाला. त्यात भीमराव यांचा मुलगा अवधूत आणि नातू मिलिंद आरोपी होते. या प्रकाराने मूळचेच एकलकोंडे असलेले भीमराव अधिकच खचले. काही काळानंतर अवधूत व मिलिंद निर्दोष सुटलेही. पण भीमरावच्या मनातील अढी मात्र कायम राहिली; ते आणखी विक्षिप्तासारखे वागू लागले.अवधूतही बिथरला होता. कुणीही आमच्या घरी यायचे नाही, अशी एककल्ली भूमिका या कुटुंबीयांनी स्वीकारली. कुणी घरी गेले तरी हाकलून देण्याचे प्रकार सुरू झाले. त्यांच्या विचित्र (पान ९ वर)कसाबसा अखेरचा निरोपबाजूच्याच गावात असलेली नर्मदाबाईची मुलगी या घटनेबाबत अनभिज्ञ होती. कुठून तरी उडत-उडत आईच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावर गेली अन् ती नवऱ्याला घेऊन तडक दगडधानोऱ्यात पोहोचली. तर घरी कुणीही नव्हते. काय झाले ते सांगायलाही कुणी नव्हते. तिने अंदाजानेच स्मशान गाठले. तिथे वेगळाच पेच निर्माण झाला होता. मृतदेहाच्या तुलनेत खड्डा छोटा झाला. ऐनवेळी पोहोचलेल्या जावयाने तो खणून मोठा केला. अन् नर्मदाबाईला कसाबसा अखेरचा निरोप देण्यात आला.या परिवारातील लोक कधीही गावाच्या संपर्कात राहात नव्हते. नातेवाइकांशीही बोलत नव्हते. साधे मतदानाच्या निमित्तानेही ते घराबाहेर इतरांमध्ये मिसळत नव्हते. मतदानच करीत नव्हते.- मनोज ठाकरे, पोलीस पाटील, दगडधानोराआमच्या गावात असे पहिल्यांदाच घडले. पण काय करावे? या परिवाराला त्यांच्या घरी कुणीही आलेले चालत नाही. मग गावकरी जाणार कसे?- गजानन महल्ले, ग्रामस्थ, दगडधानोरा