शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आमचं गाव- आमचा विकास : दांडीबाजांवर आॅन दि स्पॉट कारवाई

By admin | Updated: July 18, 2016 20:04 IST

गावाला विकासात्मक मॉडेल बनविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सुरू केलेल्या ह्यआमचं गाव- आमचा विकासह्ण या उपक्रमाला गांभीर्याने न घेणाऱ्या दांडीबाज कर्मचाऱ्यांवर

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. १८ -  गावाला विकासात्मक मॉडेल बनविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सुरू केलेल्या ह्यआमचं गाव- आमचा विकासह्ण या उपक्रमाला गांभीर्याने न घेणाऱ्या दांडीबाज कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने भरारी पथकाचे गठण केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या पथकाचे नेतृत्त्व स्वत:कडे ठेवले असून, मदतीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांचेही स्वतंत्र पथक कार्यान्वित केले आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. पुढील चार वर्षे ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाखो रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून गावात कोणकोणती कामे करता येईल, याचा आराखडा ग्रामपंचायतींना गावकऱ्यांच्या सहकार्यातून व विश्वासातून तयार करावा लागणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना मदत म्हणून जिल्ह्यात मास्टर ट्रेनरच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तीन दिवशीय कार्यशाळा, प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेले आहेत. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील ३९१ ग्रामपंचायतींनी कार्यशाळा, प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. काही ठिकाणी कार्यशाळा, प्रशिक्षणाला कर्मचारी विलंबाने हजर राहतात, कधी-कधी ग्रामसेवकांसह अन्य कर्मचारी हजरच नसतात, आदी प्रकारच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी भरारी पथकांचे गठण केले असून, कामचुकार व दांडीबाज कर्मचाऱ्यांवर आॅन दी स्पॉट कारवाई करण्याचे अधिकार या पथक प्रमुखाला दिले आहेत. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारण्याच्या सूचनाही दिल्या. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे ही प्रशिक्षणे होत नसल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यास 'आॅन दि स्पॉट' कारवाई केली जाणार आहे, असे गणेश पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.