शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

आमचे दूध, आमचा भाजीपाला आमच्याच गावात

By admin | Updated: June 3, 2017 02:05 IST

संपाच्या आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शेतकरी अधिकच आक्रमक झाला. आमचे दूध, आमचा भाजीपाला आमच्याच गावात

पुणे : संपाच्या आज दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शेतकरी अधिकच आक्रमक झाला. आमचे दूध, आमचा भाजीपाला आमच्याच गावात अशी भूमिका घेत एकही लिटर दूध गावातून बाहेर जाऊ दिले नाही. तसेच भाजीपालाही जाऊ दिला नाही. त्यामुळे दूध व भाजीपाल्याची पुरती कोंडी केली. मंचर, चाकण, नारायणगाव, सुपे यासह महत्त्वाच्या बाजार समित्यांत त्यामुळे शुकशुकाट होता. मालच आला नाही तर ग्राहक कुठून येणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बारामती, इंदापूर तालुक्यात रस्त्यावर दूध ओतून राज्य शासनाचा निषेध केला. तर शिल्लक भाजीपाला असणाऱ्या विक्रेत्यांनी तिप्पट दराने भाजीपाला विक्री सुरु केली आहे. मात्र, मंडई बंद असल्याने ग्राहकांचा सर्वत्र शुकशुकाट आहे. मालाची आवकच नसल्याने विक्रीसाठी असलेल्या भाजीपाल्याचे दर वाढले. सुपे येथील आंदोलनातील शेतकऱ्यांवर वडगाव निंबाळकर ठाण्याच्या पोलिसांनी लाठीहल्ला केला. या हल्ल्याचा निषेध शेतकऱ्यांनी केला. पुरंदर तालुक्यातील येमाई शिवरी, वाळुंज, निळुंज परिसरातील शेतकऱ्यांनी जोरदार पाठिंबा दिला. या भागातील सर्व दूध संकलन केंद्रे बंद होती. एकही लिटर दूध गावातून बाहेर जाऊ दिले नाही.खेड तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध विक्रीसाठी नेले नाही, तसेच काही गावात दूध घरोघरी कुटुंबांना वाटण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी विक्री भाजीपाला बाजारात आणला नाही. त्यामुळे आज शुक्रवारचा आठवडेबाजार असूनही बाजार भरला नाही. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या शेतमालाच्या पाट्या भिरकावून देऊन भाजीपाला जमिनीवर ओतून दिला.चााकण बाजारात कुठल्याच मालाची आवक झाली नाही. रोज भरणारा फळभाजी व पालेभाज्यांचा ठोक बाजारात शेतकऱ्यांसह व्यापारी न आल्याने बाजारात शुकशुकाट जाणवत होता. जुन्नर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे ओतूर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा, बेल्हा येथील उपबाजार केंद्र बंद ठेवण्यात आले़ या बाजार केंद्रामध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता़ बाजार केंद्रातील व्यापाऱ्यांनी देखील आपले व्यवसाय पुर्णपणे बंद ठेवले. जुन्नर शहरात दररोज पहाटे ३ वाजता भाजीपाल्याचा खरेदी-विक्री व्यवहार आज सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवला आहे. काही किरकोळ भाजीपाला विक्री व्यवसायिकांनी भाजी विक्रीचा प्रयत्न केला असता तो बंद पाडण्यात आला़ ओतूर याठिकाणी शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक राहीले़ आंबेगाव तालुक्यात शेतीमाल विक्रिसाठी पाठविण्यात आला नाही. शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे संपात भाग घेत आजही दूध अथवा शेतमाल बाजारात आणला नाही. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती आजही बंद होती. शहरातील भाजीची किरकोळ दुकाने सुध्दा बंद आहेत. त्यामुळे भाजीपाला व फळभाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. भोर तालुक्यात आज दुसऱ्या दिवशी दूध संकलन बंद टेवण्यात आले होते. घोडेगावला आजचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला.दुसऱ्या दिवशी लिलाव बंद...बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसार, भाजीपाल्यासह दररोज सरासरी ३५ लाखांची उलाढाल होते. मात्र, बुधवार (दि ७ जून) पर्यंत शेतकऱ्यांच्या संपामुळे लिलाव प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे ३५ लाखांची उलाढाल सध्या शून्यावर आली आहे. संप लांबल्यास लिलाव आणखी बंद राहण्याची शक्यता आहे. संकलन ठप्प..बारामती शहरात स्वीट होम, जनरल स्टोअर्स, दूध डेअरी आदी ठिकाणी संपाच्या दुसऱ्या दिवशी किरकोळ दूधविक्री सुरळीतपणे सुरु होती. तसेच दुधाचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे शुक्रवारी (दि. २) शहरातील बाजारपेठेतील चित्र होते. त्यामुळे दुधाचे दर ‘जैसे थे’ असल्याचे चित्र बारामती शहरात होते. दूध पोहोचविणाऱ्या गाड्या सध्या तरी रात्री दूध पुरवठा करीत आहेत. उद्या दूध पुरवठा बंद असल्याची माहिती नाही, असे दूध विक्रेत्यांनी सांगितले. बारामती दूध उत्पादक संघाचे दैनंदिन २ लाख ७० हजार लिटर दूध संकलन आहे. संपूर्ण तालुक्यातून संकलन करण्यात येते. तालुक्यातून २७० दूध संकलन केंद्रावरुन हे दूध संकलित करण्यात येते. सुमारे १५ हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून हे दूध संकलित होते. मात्र, शुक्रवार (दि. २) पासून तालुक्यातील दूध संकलन पूर्णपणे बंद झाले आहे. दूध संघाची दूध पिशवीदेखील बाहेर बाजारात वाहतूक बंद असल्याने पाठवू शकत नसल्याचे दूध संघाचे कार्यकारी संचालक सुनील इटनाळ यांनी सांगितले.शिरूर बाजार समितीत भाजीपाला, तरकारी तसेच भुसार मालाची दररोज होणारी २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली. एकीकडे हे चित्र असताना हातावरचे पोट असणाऱ्या हमाल, कामगार, चहाची गाडीवाले या घटकांना आर्थिक चणचण जाणवली. त्रास झाला तरी चालेल मात्र आपला शेतकरी बांधवांना पाठिंबा असल्याचे एक हमाल बांधवाने सांगितले.