शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार पाच वर्षे टिकणार

By admin | Updated: February 7, 2017 04:46 IST

आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.

मुंबई : आपल्या सरकारला पाच वर्षे कुठलाही धोका नाही, असे सांगतानाच मुंबई महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता नक्कीच येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. हिंदी भाषिक पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. फडणवीस सरकार हे नोटीस पिरियडवर असल्याचे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना या सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याचे संकेत दिले होते. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता फडणवीस म्हणाले की आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जे नोटीस वगैरे बोलत आहेत त्यांच्या मतांना त्यांच्याच पक्षात कोणीही महत्त्व देत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची घोषणा करण्यामागे मराठी माणसांची मते मुंबईत आपल्याकडे वळविण्याचा आपला प्रयत्न होता काय या प्रश्नात ते म्हणाले की, शिवाजी महाराज हे कोण्या एका पक्षाची मक्तेदारी कसे असू शकतात? ज्या विचारधारेला आम्ही मानतो त्या विचारधारेचे शिवरायांवरील प्रेम आणि त्यांच्या प्रतीचा आदर हा शिवसेनेपेक्षा फार आधीचा आहे. मुंबईतील मराठी माणसांचा शिवसेनेबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. मतांसाठी शिवसेनेला मराठी माणसांची आठवण होते आणि मोठी कंत्राटे देण्यापासून इतर कामांबाबत मात्र मराठी माणसाचा विसर पडतो, हे त्यांना कळून चुकले आहे. निवडणुकीनंतर भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊन मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करतील का या प्रश्नात ते म्हणाले की, भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करेल. मुंबई महापालिकेत भाजपा ही शिवसेनेसोबत होती मग तेथील गैरव्यवहारांचे आरोप केवळ शिवसेनेवरच का, यावर मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही ‘मायनर पार्टनर’ होतो. तरीही आमच्या नगरसेवकांनी त्यांच्या चुकीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठविला पण, त्यांनी कधी काँग्रेस तर कधी मनसेची मदत घेऊन प्रस्ताव मंजूर करवून घेतले.