शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

तुमची संघर्षयात्रा तर आमची संवादयात्रा - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 27, 2017 17:10 IST

शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्ष यात्रा होत नाही, मनापासून संघर्ष करावा लागतो.

ऑनलाइन लोकमत
पिंपरी , दि. 27 -  शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच संघर्षयात्रा काढत आहेत. केवळ संघर्ष नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, मनापासून संघर्ष करावा लागतो. दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवले होते, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्षयात्रेवर सडकून टीका केली. पिंपरीत भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारणीचा गुरुवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते.   
विरोधकांना त्यांच्या कर्तृत्वामुळेच संघर्षयात्रा काढावी लागत आहे. संघर्ष यात्रेला कोणचेही समर्थन मिळाले नसून कार्यकर्त्यांना घेऊन संघर्षयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांची मिळालेली सर्व पॅकेजेस याच नेत्यांनी लाटली, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. तसेच, त्यांची संघर्ष यात्रा असेल तर आमची संवाद यात्रा असेल, असे सांगून कार्यकर्त्यांना जनतेशी संवाद साधण्याचे आवाहन केले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे - 
- विश्वासाचं राजकारण केल्यानेचं भाजपाला यश 
- 2017 मध्ये मिळालेला विजय जनतेने दिलेली कामाची पावती आहे  - विकास, विश्वासाच्या राजकारणाची देशात लाट 
- ही नुसती लाट नाही, तर त्सुनामी आहे 
- लातूरमध्ये शून्यातून सत्ता मिळवली, सगळीकडे विकासाला साथ मिळत आहे
- परिवर्तन करू शकतो म्हणून आपल्याला जनतेनं कौल दिला
- भाजपा आता महाराष्ट्रव्यापी झाला आहे 
- भाजपला मिळालेलं यश हा लोकांनी दाखवलेला विश्वास आहे, तो कायम ठेवा 
 - जनतेशी असलेली नाळ तुटू देऊ नका
- मराठवाड्यात भाजपची मोठी वाढ झाली
- जनता ही राम आहे, आपल्याला रामराज्य निर्माण करायचंय 
- छोट्या पदाच्या अहंकाराने आपण लोकांपासून दूर जातो 
- सत्ता परिवर्तनाकरिता कार्यकर्ता काम करत होता. आता तसं करायचं नाही, तर समाज परिवर्तन करायचं आहे 
- काँग्रेसचे सर्व बुरूज ढासळले, पिंपरीत पवारांचा बुरुजही ढासळला, कमळ फुलले. 
- भाजपा हा महाराष्ट्रव्यापी पार्टी आहे , कोणत्याही एका विभागाचा नाही 
- एवढी वेगवेळी अनेकजण पदे घेतात, मग त्यांचं नाव कोणाला माहीत नसतं. त्याचं कर्तृव्य लक्षात राहतं 
- विजयाने उन्मत्त, अहंकारी न होता प्रामाणिकपणे काम करुन समाज परिवर्तन घडवायचंय 
- जातीचं, भ्रष्ट्राचाराचं आपल्याला राजकारण करायचं नाही 
- भाजपाच्या सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारदर्शकतेबाबत तडजोड करू नये 
- संघर्ष यात्रेला नाव दिल्यानं संघर्ष होत नाही. मनापासून संघर्ष करावा लागतो 
- संघर्ष यात्रेला समर्थन मिळाले नाही, कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष यात्रा सुरू आहे, त्याकडे लोकांनी पाठ फिरवली आहे 
- केवळ नाव दिल्याने संघर्षयात्रा होत नाही, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवलं होतं
- त्यांची संघर्ष यात्रा असेल, तर आमची संवाद यात्रा असेल 
- पंतप्रधानांचं पॅकेज आलं ते त्यांच्या आमदार, खासदारांनी खाऊन टाकलं 
- जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मागेलं त्याला शेततळं दिलं  
- जलयुक्त शिवारमुळे दुबार पेरणीची नामुष्की टळली 
- मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधला पाहिजे 
- वेगवेगळ्या योजणांच्या माध्यमातून संवाद जनतेशी साधला पाहिजे 
- तुमची संघर्षयात्रा तर आमची संवादयात्रा, आमदार, खासदार शिवारावर संवाद साधतील, एसी बसने प्रवास नसेल 
- शेतकऱ्यांच्या आजच्या अवस्थेला जबाबदार असलेले नेतेच आज संघर्षयात्रा काढत आहेत 
-  देशात 11 लाख टन खरेदी, एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन खरेदी 
- 20 हजार तूर घेऊन तुम्ही शेतक-यांना रस्त्यावर सोडलं होतं 
- शेतकऱ्यांच्या नावानं व्यापारीकरण खपवून घेतलं जाणार नाही