शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

आमचा अजेंडा कोपर्डीच राहणार - भय्यूजी महाराज

By admin | Updated: September 21, 2016 21:50 IST

आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि तोच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या असून, मराठा समाजाने तो प्रश्न वेगळा सोडवावा

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. २१ : आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि तोच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या असून, मराठा समाजाने तो प्रश्न वेगळा सोडवावा, असे स्पष्टीकरण राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या वतीने सूर्योदय परिवाराने बुधवारी येथे दिले.

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाचे राज्यभर मोर्चे निघत आहेत. मोर्चाच्या आयोजनातील भय्यूजी महाराज यांच्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सूर्योदय परिवाराने पत्रकार परिषद घेऊन भय्यूजी महाराज यांची बाजू विशद केली. भय्यूजी महाराजांचे निवेदनही त्यांनी प्रसिद्धीस दिले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, हितेन पटेल, मनोज जैस्वाल, संतोष पाटील, जितेश खुराणा, किशोर देशमुख, दीपक यादव, सत्यकुमार शेळके यावेळी उपस्थित होते.

मराठा मोर्चात मी का लक्ष घालतो, मला प्रसिद्धीचा हव्यास आहे काय, अशा चर्चा सोशल मीडियात सुरू आहेत; परंतु केवळ मानवतेच्या भूमिकेतूनच मी कोपर्डीचा प्रश्न हाती घेतला. कुणाच्या स्वार्थापायी या प्रश्नाला बिभीत्स वळण लागावे, या निर्घृण अत्याचारात बळी पडलेल्या अभागी कन्येच्या वेदनेचा तसेच तिच्या मातेचा मी अपमान समजतो,ह्णअसे भय्यूजी महाराज यांनी निवेदनात म्हटले आहे.

मागणी धसास लागेपर्यंत लढत राहणारकोपर्डीतील घटना समोर आल्यानंतर मी सर्वप्रथम तेथे पोहोचलो. दु:खी कुटुंबाला आध्यात्मिक बळ दिले. शाळेत जाण्यास घाबरलेल्या मुलींसाठी चार बसेस दिल्या. कन्याधाम सुरक्षा योजना सुरू केली, तसेच गावात संस्कार अभियान सप्ताह घेतला. पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि तिचे हाल करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी तेव्हापासून लावून धरली असून, ती धसास लागेपर्यंत लढत राहणार आहे,ह्णअसे निवेदनात म्हटले आहे.

श्रेय, प्रसिद्धीचा प्रश्नच नाहीकोपर्डीच्या निषेधार्थ निघणाऱ्या मोर्चांतून श्रेय व प्रसिद्धी घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोकप्रियता मला नवीन नाही. कुठलाही राजकीय स्वार्थ मला साधायचा नसून, माझा मार्ग सेवेचा आहे, असे भय्यूजी महाराज यांनी स्पष्ट केले आहे.