शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

... अन्यथा शिघ्र कृती दल स्थापन करू

By admin | Updated: August 21, 2016 21:03 IST

अधिकाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने पावले उचलावीत.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 21 - अधिकाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. अधिकाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने उचलावी, अन्यथा आमच्या संरक्षणासाठी आम्हाला शिघ्र कृती दल स्थापन करावे लागेल, असा ईशारा महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने दिला आहे. नियमबाह्य कामे करण्यास विरोध केल्यामुळे जि.प. सदस्य संभाजी डोणगावकर याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. बेदमुथा यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांच्यावर सात दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. आजही त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही. ते प्रचंड दहशतीखाली आहेत. या घटनेची दखल विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने घेतली असून आज रविवारी या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक औरंगाबादेत झाली. या बैठकीस राज्यभरातील १२५ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष गणेश चौधरी म्हणाले की, सुरेश बेदमुथा यांच्यावरील हल्ल्यामुळे राज्यभरातील अधिकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या प्रकरणातील आरोपी डोणगावकर यास अजुन अटक झालेली नाही. शासनाने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने सदस्यत्व रद्द करण्याचा कायदा प्रभावी करावा. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना द्यावेत. यासाठी शासनाने कायद्यात सुधारणा करावी. या प्रकरणी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत कारवाई करावी, अन्यथा २ आॅक्टोबरपासून महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटना राज्यभर आंदोलन करणार आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश कुलकर्णी यांनी या घटनेमुळे चुकीचा पायंडा पडू नये म्हणून शासनाने गुंड प्रवृत्तीचा जि.प. सदस्य संभाजी डोणगावकर याचे सदस्यत्व तात्काळ रद्द केले पाहिजे, अशी मागणी केली. यावेळी सचिव अशोक पाटील, वासुदेव सोळंके, मुकीम देशमुख, मंजुषा कापसे आदींसह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.