शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा श्रमिक मुक्ती दलाचे आंदोलन

By admin | Updated: November 5, 2016 03:11 IST

औद्योगिक क्षेत्रातील संपादनातील क्षेत्र ‘विनाअधिसूचित’ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रायगड जिल्हा प्रशासनाने एका महिन्याच्या आत पूर्ण करावी

अलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड या गाव परिसरातील जमीन टाटा पॉवर कंपनीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाकरिता संपादित करण्याच्या महसूल विभागाच्या प्रक्रियेत, धेरंड-शहापूर येथील ३७२.५ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्रातील संपादनातील क्षेत्र ‘विनाअधिसूचित’ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी रायगड जिल्हा प्रशासनाने एका महिन्याच्या आत पूर्ण करावी, अन्यथा शेतकरी जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा दिला. याबाबतचे निवेदन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच झालेल्या शेतकरी बैठकीअंती जिल्हा प्रशासनास देण्यात आले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे रायगड जिल्हा प्रतिनिधी राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.खरेतर या निर्णयाबाबत गेल्या ४ एप्रिल २०१६ रोजी जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या समवेत तर २२ जुलै २०१६ रोजी अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनवणे यांच्या समवेत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळा समवेत झालेल्या बैठकीत, कलम ११ (१) ची अधिसूचना व्यपगत झाली असल्याने, धेरंड-शहापूर येथील ३७२.५ एकर क्षेत्र शहापूर-धेरंड औद्योगिक क्षेत्रातील संपादनातील क्षेत्र ‘विना अधिसूचित’ करण्याची कार्यवाही करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने हे निवेदन पुन्हा देण्यात आल्याचे भगत यांनी स्पष्ट केले. निवेदनासोबत जिल्हा प्रशासनाच्या माहितीसाठी खारलँड व एमआयडीसीचे राजपत्र देण्यात आले आहे. यामध्ये एमआयडीसीने बेकायदा खारलँडच्या क्षेत्रात संपादन केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी संबंधित क्षेत्र वगळणेकामी ‘विनाअधिसूचित’ करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी पनवेल यांना द्यावा. तसेच हे निवेदन मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत ‘विनाअधिसूचित’ केल्याचे राजपत्रात घोषित करावे व प्रस्तावाची एक प्रत संघटनेस द्यावी. मात्र तसे न झाल्यास शेतकरी जनतेला आंदोलनावाचून पर्याय राहणार नाही. त्याचप्रमाणे खारलॅन्ड विभागाचा ‘ना हरकत दाखला’ मिळालेला नसताना, भूसंपादन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी करावी, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली असल्याचे भगत यांनी सांगितले.महाराष्ट्र खारभूमी कायदा १९७९ मधील उपकलम १२ (१) (२) (३) ची अंमलबजावणी करण्यासाठी २५ डिसेंबर २००३ रोजी सरकारी राजपत्र प्रसिध्द झाले. ज्यामध्ये धेरंड व शहापूर येथील खारभूमी क्षेत्राचा समावेश आहे. मौजे धेरंड येथील ३७२.५ एकर क्षेत्राचा समावेश खारभूमी ‘उपजाऊ क्षेत्र’ म्हणून करण्यात आला. शहापूर धेरंड औद्योगिक क्षेत्रास पुनर्वसन अधिनियम १९९९ चा कायदा लागू केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करता येणार नाही, असे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने १० जानेवारी २००७ रोजी शेतकऱ्यांना लेखी पत्राव्दारे लिहून दिले आहे.>ना हरकत दाखला दिला नाहीखारभूमी विभागाकडे श्रमिक मुक्ती दलाने पाठपुरावा केल्यानंतर १३ जानेवारी २०१६ रोजी खारभूमी विभागाने टाटा पॉवर कंपनीस तसेच विशेष भूसंपादन अधिकारी रायगड यांना ‘ना हरकत दाखला दिलेला नाही ’ असे लेखी पत्राव्दारे सांगितले असल्याची माहिती भगत यांनी दिली.खारभूमी विभागाचा ‘ना हरकत दाखला’ प्राप्त झालेला नसतानाच, कलम १३ (३) अधिसूचना बेकायदा काढल्याने खारभूमी उपजाऊ क्षेत्राचे संपादन असलेल्या क्षेत्राची पुनर्वसन कलम ११(१) अन्वये अधिसूचित क्षेत्र व्यपगत झाले असल्याचेही भगत यांनी स्पष्ट केले आहे.>कायद्यानुसार घेण्यात आलेले निर्णय जिल्हाधिकारी बदलले तर बदलत नसतात. परिणामी पुनर्वसन कलम ११ (१) अन्वये अधिसूचित क्षेत्र व्यपगतताविषयक निर्णयाची अंमलबजावणी विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांना करावी लागेल, अन्यथा तीव्र शेतकरी आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.- डॉ.भारत पाटणकर, अध्यक्ष, श्रमिक मुक्ती दल