शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा अवमान याचिका

By admin | Updated: September 10, 2016 03:09 IST

फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात फेरीवाला संघटनांनी आता न्यायालयीन लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात फेरीवाला संघटनांनी आता न्यायालयीन लढा देण्याचा पवित्रा घेतला आहे. महापालिकेची कारवाई चुकीची आहे. पोलीसही त्यांना बेकायदा संरक्षण देत आहेत. ही कारवाई न थांबल्यास या दोघांविरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी दिली.कल्याण-डोंबिवली शहरातील फेरीवाला संघटनांनी एकत्रित येऊन न्याय्य हक्कांसाठी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना केली आहे. कारवाईविरोधात फेरीवाल्यांमध्ये असंतोष आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी समितीतर्फे गुरुवारी बैठक झाली. महापालिकेची कारवाई बेकायदा आहे. केंद्र सरकारच्या कायद्यानुसार महापालिकेला फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. सध्याची कारवाई चुकीची आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाचाही महापालिकेने अवमान केला आहे. त्यामुळे ही कारवाई न थांबल्यास मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यात महापालिका, पोलीस आणि राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात येणार येईल. यासंदर्भात मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही लवकरच भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाईल, अशी माहिती मोरे यांनी दिली. दरम्यान, या बैठकीला मोरे यांच्यासह बबन कांबळे, संजय जाधव, प्रशांत माळी, दिनेश तावडे, राजू सोनावळे, अभय दुबे, रमेश हनुमंते, प्रशांत सरखोत आदी समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.>महापौरांच्या आदेशही धाब्यावरगणेशोत्सवात फेरीवाल्यांविरोधातील कारवाई शिथील करा, असे आदेश महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले होते. मात्र याउपरही ‘क’ प्रभागात जोमाने कारवाई सुरू आहे, असा आरोप फेरीवाला संयुक्त संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत माळी यांनी केला आहे. प्रशासनाची सुरू असलेली कारवाई पाहता हे एकप्रकारे महापौरांच्या आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याची टीका माळी यांनी केली आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.