शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मंजुळा हत्येत कारागृहातील अन्य अधिकारीही सहभागी

By admin | Updated: July 8, 2017 04:39 IST

मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात सहा आरोपींसह कारागृहातील अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणात सहा आरोपींसह कारागृहातील अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सहाही आरोपींच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे.या आरोपींची कोठडी वाढविण्यासाठी त्यांना किल्ला कोर्टातील अतिरिक्त महादंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात आरोपींनी अन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सीसीटीव्ही फुटेजबाबत फॉरेन्सिक लॅबकडून आलेल्या अहवालातही या आरोपींसह अन्य अधिकाऱ्यांच्या आक्षेपार्ह हालचाली आढळून आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या हत्याकांडात सहा आरोपींबरोबरच कारागृहातील अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची दाट शक्यता प्रभा राऊळ यांनी महादंडाधिकाऱ्यांसमोर वर्तविली. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेलर मनीषा पोखरकर, अंमलदार बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे या सहाही जणी मंजुळाचे केस ओढून तिला मारहाण करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या हातात काठीही दिसून आली. या काठीच्या शोधासाठी आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली; मात्र ती तिथे सापडली नाही. त्यातच अटक केलेल्या आरोपींना कायद्याचे ज्ञान असल्याने त्या तपासात सहकार्य करत नाहीत, तपास अधिकारी प्रभा राऊळ यांनी न्यायालयात सांगितले. अतिरिक्त महादंडाधिकारी आर.एस. अराध्ये यांच्यासमोर सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी शुक्रवारी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून मागितली. या प्रकरणातील सहाही आरोपींच्या गुन्ह्यांचा सहभाग नेमका काय आहे? तिला मरेपर्यंत मारण्याचा नेमका हेतू काय आहे, त्याचा तपास सुरू आहे. तसेच कारागृहातील २९१ कैद्यांचे जबाब नोंदविणेही बाकी असून त्यांच्याकडे चौकशी करणे जिकिरीचे काम असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.तथापि, आरोपींचे जबाब नोंदवून झाले आहेत. फक्त एका ‘काठी’च्या शोधासाठी त्यांच्या कोठडीत वाढ न करता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी आरोपींचे वकील पंकज बाफना यांनी केली. हा युक्तिवाद ऐकल्यानंतर महादंडाधिकारी अराध्ये यांनी आरोपींना १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.स्वाती साठेंची माघार...कारागृहाच्या वतीने मंजुळा शेट्ये प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील मजकुराने आरोपींना केलेल्या सहकार्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. ‘आरोपी जेलकर्मी आपल्या भगिनी आहेत. त्यांना वाचवायला हवे,’ असा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या तपासावर संशय व्यक्त करण्यात आला. कारवाईचा बडगा उगारला जाण्याच्या शक्यतेने त्यांनी शुक्रवारी स्वत:हून या प्रकरणातून माघार घेतली. त्यांनी कारागृहाचे अप्पर पोलीस महासंचालक बी.के. उपाध्याय यांच्याकडे आपल्यावर होत असलेल्या आरोपांमुळे माझ्याकडे तपास देणे योग्य नसल्याचे सांगितले. तसेच तपास काढून घेण्याची मागणी केली. त्यांच्या अर्जावरून हा तपास तुरुंग महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.