शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ओशिवरा स्थानक डिसेंबरपासून सुरू

By admin | Updated: May 16, 2016 02:41 IST

गोरेगावकरांच्या प्रतीक्षेत असलेले जोगेश्वरी आणि गोरेगावमधील ओशिवरा हे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील नवीन रेल्वे स्थानक येत्या डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे

मुंबई: गेली अनेक वर्षे गोरेगावकरांच्या प्रतीक्षेत असलेले जोगेश्वरी आणि गोरेगावमधील ओशिवरा हे पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील नवीन रेल्वे स्थानक येत्या डिसेंबर मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे गोरेगाव रेल्वे स्थानकावरील ताण कमी होणार असल्याचा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंधेरीपर्यंत असलेल्या हार्बर रेल्वेचा गोरेगांवपर्यंत लवकर विस्तारीकरण होण्यासाठी, तसेच गोरेगावला आदर्श रेल्वे स्थानक बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही देसाई यांनी या भेटीवेळी दिले. या कामी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले. सुमारे दीड तास गोरेगाव रेल्वे स्थानकावरील हार्बर रेल्वेच्या कामांची पाहणी आणि गोरेगावकरांना भेडसावत असलेल्या रेल्वे समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांनी गोरेगाव रेल्वे स्थानकाला भेट दिली. या वेळी मुंबई पश्चिम रेल्वेचे विभागीय अधिकारी मुकुल जैन, अंधेरी ते गोरेगांव हार्बर रेल्वे प्रकल्प अधिकारी खुराणा, पश्चिम रेल्वेचे सहायक अधिकारी शैलेंद्र, गोरेगावचे स्टेशन मास्टर चोरगे, पी (दक्षिण) विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा लोचना चव्हाण, उपविभागप्रमुख शशांक कामत व दीपक सुर्वे, महिला उपविभाग संघटक सुमंगल कोलथलकर, नगरसेवक राजू पाध्ये, नगरसेविका प्रमिला शिंदे, नगरसेविका वर्षा टेंबवलकर, शिवसेना व्यापारी संघटनेचे विरेंद्र लिबाचिया, रेल्वे प्रवासी संघटनेचे विष्णू अगरवाल आणि गोरेगावकर नागरिकांची या वेळी उपस्थिती होती.गोरगाव रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या बैठकीत मुकुल जैन यांनी गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे विस्तारीकरणात १० ठिकाणी गृहनिर्माण सोसायट्या आणि जागेचे मालक यांच्याबरोबर रेल्वेला जागा हस्तांतरणाचा प्रश्नाचा तिढा अडकल्याचे सांगितले. या प्रकरणी आपण एमएमआरडीए आणि संबंधित सोसायट्या आणि जागेच्या मालकांबरोबर बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे देसाई म्हणाले. गोरेगाव (प) बेस्टची संरक्षक भिंतीचा येथील पादचारी पुलाला अडथळा होत आहे. बेस्टकडून जागेची एनओसी रेल्वे प्रशासनाला मिळत नसल्याची माहिती जैन यांनी या वेळी दिली. याबाबतीत लवकरच बेस्ट प्रशासनाबरोबर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासनही उद्योगमंत्र्यांनी या वेळी दिले.पावसाळा जवळ आल्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील नाले लवकर साफ करावेत, तसेच स्वछता राखण्यात यावी, याकडे देसाई यांनी लक्ष वेधून या प्रकरणी शिवसेनेचे येथील नगरसेवक आणि पालिका प्रशासन सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. गोरेगावच्या नवीन रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा लवकरच बदलेल, असा विश्वास देसाई यांनी या वेळी व्यक्त केला.