शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पेशव्यांचे मूळ गाव उपेक्षितच

By admin | Updated: May 18, 2016 02:55 IST

रायगडमधील श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. मात्र पेशवेकालीन ऐतिहासिक खुणा आजही या ठिकाणी पाहायला मिळतात

श्रीकांत शेलार,

दांडगुरी- रायगडमधील श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव. मात्र पेशवेकालीन ऐतिहासिक खुणा आजही या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र केवळ सरकारच्या दुर्लक्षामुळे हे शहर विकासापासून वंचित आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धन चित्पावन घराण्यातील पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणाऱ्या श्रीवर्धन येथे पेशवे घराण्याची पिढीजात देशमुखी होती, असा इतिहास सांगतो. त्यामुळे इतिहासप्रेमी तसेच ऐतिहासिक ठेवा जाणण्याची इच्छा असलेले पर्यटक आजही श्रीवर्धनला आवर्जून भेट देतात. श्रीवर्धन येथे बाळाजी विश्वनाथाच्या वाड्याच्या चौथऱ्याचे काम विशिष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. श्रीवर्धन नगरपालिकेने १९८८ मध्ये ‘श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर’ उभारले आहे. त्याच्या आतील बाजूस १.५२ मी. उंचीच्या चौथऱ्यावर तेवढ्याच उंचीचा बाळाजी विश्वनाथचा पूर्णाकृती कांस्य पुतळा आहे. चौथऱ्याच्या दर्शनी भागावर बाळाजींचा चित्रवृत्तान्तचा उल्लेख आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूस ब्रह्मेंद्रस्वामी आणि उजव्या बाजूस छत्रपती शाहू महाराज यांचे अर्धपुतळे आहेत. सद्य:स्थितीत श्रीवर्धन शहरात श्रीमंत पेशवे स्मारक मंदिर असा फलक लाऊन तटबंदी केलेला परिसर आहे. श्रीवर्धनला येणारे पर्यटक पेशव्यांचे ठिकाण पाहण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येतात. पण येथे पेशव्यांच्या स्मारकाशिवाय ऐतिहासिक असे काही नसल्याने त्यांचा हिरमोड होतो. पेशव्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरात त्यांचे कर्तृत्व दर्शवणारी विशेष ओळख असावी, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. >सुशोभीकरणाची गरजपेशवे मंदिर परिसरातील सहा गुंठे जागा ही स्मारकासाठी आरक्षित आहे तर उर्वरित जागा ट्रस्टच्या नावे आहे. भविष्यात येथे पेशवे मंदिर उभारण्यासाठी या दोन्ही जागांचे आरक्षण सुधारित नियोजन आराखड्यात करण्यात आल्याचे समजते. ही जागा सुशोभित केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास स्थानिकांना आहे.