मुंबई : मुंबई महापालिकेच्या कंत्रटदाराकडे तब्बल तीन कोटींची खंडणी मागणा:या ऑटोमोबाइल इंजिनीअर आणि त्याने तयार केलेल्या संघटित टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गजाआड केले. विनय प्रधान (27) असे या तरुणाचे नाव असून, तो चित्रपट पटकथा लेखकही आहे. त्याला एक चित्रपट काढायचा होता. त्यासाठी फायनान्स उभा करण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
गेल्या महिन्यात या व्यावसायिकाला उत्तर प्रदेशातील मोबाइल क्रमांकावरून धमकीचा पहिला फोन आला. तीन कोटी न दिल्यास ठार मारण्याची धमकी समोरून बोलणा:याने दिली. काही दिवस धमकीचे फोन आले नाहीत़ त्यामुळे व्यापा:यानेही त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा धमकीचे फोन सुरू झाले. या वेळी मात्र धमकी देणारा व्यापा:याला त्याच्या कुटुंबीयांची, व्यवसायाची इत्थंभूत माहिती देऊ लागला. तसेच या वेळी धमक्यांकडे दुर्लक्ष केल्यास कुटुंबीयांना ठार करू, असे धमकावू लागला. तेव्हा मात्र व्यापा:याने हे फोन गांभीर्याने घेतले आणि खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार केली.
दरम्यान, खंडणीखोरांशी व्यापा:याची चर्चा सुरू होती. अखेर 25 लाखांवर सौदा ठरला. खंडणीखोरांनी व्यापा:याला वाशीच्या इनॉर्बिट मॉलमध्ये बोलावून घेतले. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक वत्स, निरीक्षक जयवंत सकपाळ, अनिल वाढवणो, सुधीर दळवी, विवेक भोसले, विनायक मेर आणि पथकाने वेषांतर करून मॉलभोवती सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी पाच खंडणीखोर 25 लाख नेण्यासाठी तेथे आले आणि पथकाने त्यांची गचांडी आवळली.
चौकशीत विनय या टोळीचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न झाले. अरविंद सिंग, आरीफ खान, सर्फराज शेख आणि जाफर रईस अशी अन्य अटक झालेल्यांची नावे आहेत. विनय एका खासगी कंपनीत डिझेल जनरेटर सेल्स इंजिनीअर म्हणून नोकरी करीत होता. त्याने काही दिवसांपूर्वी तक्रारदार व्यापा:याला 15 लाख रुपये किमतीचा डिझेल जनरेटर विकला होता. या व्यवहाराच्या निमित्ताने विनयने या व्यापा:याची संपूर्ण माहिती काढली होती.
विनयने स्वत: लिहिलेल्या कथेवर पिकनिक नावाचा चित्रपट काढायचा होता. त्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने हा कट रचला. त्यापैकी अरविंदचा एपीएमसी मार्केटमध्ये फळविक्रीचा धंदा आहे. मात्र तोही तोटय़ात असल्याने तो विनयला मदत करण्यास तयार झाला. आरीफ बॅटरी विक्रेता असून, उर्वरित दोघे रिक्षाचालक असल्याचे गुन्हे शाखेतून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)