शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘सणाच्या काळात अवयवदान जागृती करा’

By admin | Updated: September 3, 2016 00:34 IST

अवयवदानाविषयी समाजात जनजागृती होत असून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन लोकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हा सहभाग वाढण्यासाठी गणेशोत्सव आणि

मुंबई : अवयवदानाविषयी समाजात जनजागृती होत असून मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊन लोकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हा सहभाग वाढण्यासाठी गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात अवयवदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. उत्सव मंडळांनी अवयवदान जनजागृतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. समाजात प्रबोधन होणे गरजेचे आहे. सरकारने सुरू केलेल्या अवयवदान महाअभियान चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त व्हायला हवे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. राज्य सरकारतर्फे ‘अवयवदान महाअभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय अभियानांतर्गत मुंबई विद्यापीठात अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, डॉ. गुस्ताद डावर आणि जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. या वेळी १९ अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना महाजन यांनी पुढे सांगितले, विदेशात अवयव सहजतेने प्राप्त होतात. मात्र आपल्या देशात अंधश्रद्धेमुळे हे प्रमाण कमी आहे. ही अंधश्रद्धा कमी व्हायला पाहिजे. असे झाल्यास अवयवदानाचे प्रमाण वाढेल. (प्रतिनिधी)