शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डान्सबारविरोधात संघटनांची निदर्शने

By admin | Updated: May 7, 2016 02:03 IST

राज्यातील डान्सबार कोणत्याही परिस्थितीत सुरू होता कामा नये, अशी मागणी करीत शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांनी आझाद मैदानात निदर्शने केली. राज्यात एकतरी डान्सबार

मुंबई : राज्यातील डान्सबार कोणत्याही परिस्थितीत सुरू होता कामा नये, अशी मागणी करीत शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांनी आझाद मैदानात निदर्शने केली. राज्यात एकतरी डान्सबार सुरू झाला, तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलनाच्या निमंत्रक आमदार विद्या चव्हाण यांनी दिला.चव्हाण म्हणाल्या की, सर्व संघटनांचा विरोध डान्सबारला असून बारबालांना नाही. काही संघटना उगाचच बारबालांचा आकडा फुगवून सांगत आहेत. राज्यात १७ हजारांच्या आसपास बारबाला असून, त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. संघटनेत असलेल्या उद्योजकांमार्फत अधिकाधिक महिलांना रोजगार देण्याचे काम केले जाईल. मात्र चैन करण्याइतपत पगार न देता उदरनिर्वाहापुरता पगार नक्कीच महिलांना मिळेल.केवळ जाचक अटी टाकून डान्सबारवर बंदी घालता येणार नसल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, सरकारने कायद्यातील पळवाटा शोधून कडक कायद्याची निर्मिती करायला हवी. त्याशिवाय डान्सबारवर संपूर्ण बंदी शक्य होणार नाही. शिवाय न्यायालयातही त्याचा टीकाव लागेल. मात्र डान्सबार बंदी टिकवण्यात सरकारची इच्छाशक्ती कमी दिसत आहे. यावेळी निदर्शनांमध्ये स्त्री शक्ती संघटना, घरहक्क जागृती मंच, सद्भावना संघ, जमात ए इस्लामी या संघटनांसह इतर संघटनाही सामील झाल्या होत्या. निदर्शनांमध्ये मुस्लीम महिलांची संख्या अधिक होती. काही हजार महिलांसाठी न्यायालयाने लाखो लोकांच्या संसारावर वरवंटा फिरवू नये, अशा संतप्त प्रतिक्रिया महिलांमधून उमटल्या. (प्रतिनिधी)