शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

आदेशानंतर मिळणार बांधकामांना मंजुरी

By admin | Updated: April 27, 2016 04:02 IST

नव्या बांधकामावर घालण्यात आलेली बंदी सोमवारी उच्च न्यायालयाने उठविल्याने लगेचच मंगळवारपासून बांधकाम आराखडा मंजुरीची कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती.

कल्याण : घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर नव्या बांधकामावर घालण्यात आलेली बंदी सोमवारी उच्च न्यायालयाने उठविल्याने लगेचच मंगळवारपासून बांधकाम आराखडा मंजुरीची कामे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. परंतु न्यायालयाच्या निर्णयाची प्रत केडीएमसीला न मिळाल्याने हे काम अजून सुरू झालेले नाही. ही प्रत गुरूवारपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता असून त्यानंतरच आराखडे मंजूर होतील, असे नगररचना विभागाकडून सांगण्यात आले.क्षमता संपुष्टात आल्यानंतरही आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकणे, घनकचरा व्यवस्थापनाची कार्यवाही योग्य प्रकारे न करणे या मद्द्यावर न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर गेल्यावर्षी १३ एप्रिलला झालेल्या सुनावणीदरम्यान जोपर्यंत घनकचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही, तोपर्यंत केडीएमसी क्षेत्रात नवीन बांधकामांवर बंदीचा आदेश न्यायालयाने दिला होता. ही बंदी सोमवारी उठविण्यात आल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तब्बल वर्षभर रखडलेल्या बांधकाम परवानगीचा मार्ग मोकळा झाल्याने मंगळवारपासून बांधकाम आराखडा मंजुरीसाठी केडीएमसीच्या नगररचना विभागात बांधकाम व्यावसायिकांची लगबग सुरू होण्याची शक्यता होती. परंतु न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप हाती न आल्याने ही कामे सुरू झाली नसल्याची माहिती नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी दिली. दोन दिवसात आदेशाची प्रत उपलब्ध होईल. त्या आदेशाचा अभ्यास करून पुढील अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)