शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

दिघी बंदर सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 04:35 IST

दिघी, मणेरी, नानवली आणि कर्लास या गावांना आश्वासन दिल्याप्रमाणे पाणीपुरवठा न केल्याने सील

मुंबई : दिघी, मणेरी, नानवली आणि कर्लास या गावांना आश्वासन दिल्याप्रमाणे पाणीपुरवठा न केल्याने सील करण्यात आलेले दिघी बंदर सुरू करण्याचा आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिला. गावकऱ्यांना पाणीपुरवठा करणे बंद केले, तर पुन्हा बंदराला टाळे ठोकू, असा इशाराही या वेळी उच्च न्यायालयाने दिला.२०११मध्ये दिघी बंदराचे वाढीव बांधकाम करताना व्यवस्थापनाने दिघी, नानवली, कर्लास, मणेरी आदी गावांना वीज व टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार काही दिवस दिघी बंदर व्यवस्थापनाने गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करूनही दिल्या. मात्र, दिघी जवळ असलेल्या कुडकी गावाने पाणी देण्यास नकार दिल्याची सबब पुढे करत, व्यवस्थापनाने संबंधित गावांना टँकरने पाणी पुरवण्यास नकार दिला. याविरुद्ध दिघीच्या काही रहिवाशांनी अ‍ॅड. आर. मेंदाडकर व चिंतामणी भणगोजी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.२०११पासून आतापर्यंत दिघी बंदर व्यवस्थापन गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करत असल्याचे पाहून उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीत दिघी बंदर व्यवस्थापनासह नगरविकास विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय, रायगडचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांना त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली. उच्च न्यायालयाच्या या नोटिशीनंतर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २८ एप्रिल रोजी दिघी बंदराला टाळे ठोकले. त्यामुळे दिघी बंदर व्यवस्थापनाने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत सील काढण्याचे आदेश दिले. सोबतच गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात न आल्यास पुन्हा टाळे ठोकू, असा इशाराही दिला. (प्रतिनिधी)... तर पुन्हा टाळे लावणारगुरुवारच्या सुनावणीत दिघी बंदराने चार गावांना दरदिवशी पाच हजार लिटर क्षमता असलेले १०० टँकर पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी न्यायालयात ७० लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्टही जमा केला. उच्च न्यायालयाने हे डिमांड ड्राफ्ट जमा करून घेत, यापुढे गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात आला नाही, तर पुन्हा बंदराला टाळे ठोकू, असा इशारा दिघी बंदर व्यवस्थापनाला देत, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिघी बंदर पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला.