मुंबई : वादग्रस्त आदर्श सोसायटीतील आजी-माजी सदस्यांची यादी सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी सोसायटीला दिले.या घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाचा अहवालही राज्य शासनाने सादर करावा, असे आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने दिले. २० जुलैपर्यंत उभयतांना ही माहिती न्यायालयात सादर करायची आहे. आदर्श सोसायटीचा भूखंड आमचा असून त्यावर बेकायदेशीररित्या ही इमारत उभी आहे. त्यामुळे हा भूखंड आम्हाला परत द्यावा, अशी मागणी करणारा दावा संरक्षण दलाने न्यायालयात केला आहे. तर ही इमारत पाडा, असे आदेश केंद्रीय वन व पर्यावरण विभागाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. या आदेशाला सोसायटीने आव्हान दिले आहे. या दोन्ही याचिकांवर खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. (प्रतिनिधी)
आदर्श सदस्यांची यादी सादर करण्याचे आदेश
By admin | Updated: June 23, 2015 02:06 IST