शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

खून हा अपघात ठरवून विम्याची रक्कम देण्याचा आदेश

By admin | Updated: November 22, 2014 03:10 IST

अपघात विमा घेतलेल्या विमाधारकाचा खून झाला तरीही तो मृत्यू अपघातीच ठरतो, असा निकाल देऊन ग्राहक न्यायालयाने ठाण्यातील एका महिले

मुंबई: अपघात विमा घेतलेल्या विमाधारकाचा खून झाला तरीही तो मृत्यू अपघातीच ठरतो, असा निकाल देऊन ग्राहक न्यायालयाने ठाण्यातील एका महिलेस तिच्या दिवंगत मुलाच्या विम्याची २ लाख रुपयांची रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.कायद्याच्या परिभाषेत ‘अपघात’ या शब्दाच्या व्याख्येची व्याप्ती वाढवून त्यात खुनाचाही अंतर्भाव करणारा हा पहिलाच न्यायालयीन निकाल मानला जात आहे. ठाणे (प.) राबोडी येथे वृंदावन सोसायटीजवळ राहणाऱ्या श्यामला रघुवीर प्रभू यांनी केलेली फिर्याद मंजूर करून दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एस.एम. रत्नाकर व सदस्य एस. जी. चाबुकस्वार यांनी हा निकाल दिला.त्यानुसार नॅशनल इन्श्युरन्स कंपनीने विम्याची दोन लाख रुपयांची रक्कम जून २०१०पासूनच्या सहा टक्के व्याजासह श्यानला प्रभू यांना द्यायची आहे. याखेरीज दावा निकाली काढण्यास विलंबलावून मानसिक क्लेश दिल्याबद्दल चार हजार रुपये व न्यायालयीन खर्चापोटी तीन हजार रुपयेही विमा कंपनीने प्रभू यांना द्यायचे आहेत.फिर्यादी श्यामला प्रभू यांचा मुलगा दिलीप याचा १८ सप्टेंबर १९९६ रोजी कल्याण रेल्वे स्टेशनवर खून झाला होता. विक्रोळी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस असलेल्या दिलीपने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे ‘क्लासिक क्रेडिट कार्ड’ घेतले होते व त्याचा अनुषंगिक लाभ म्हणून बँकेन नॅशनल इन्श्युरन्स कंपनीकडे दिलीपचा गट अपघात विमा उतरविला होता. या विमा पॉलिसीनुसार रस्ते अपघतात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये व विमान अपघातात मृत्यू झाल्यास चार लाख रुपये विमा कंपनीने वारसाला द्यायची होती. नानाविध कारणे सांगून विमा कंपनीने रक्कम देण्यास नकार दिला म्हणून ही फिर्याद दाखल केली गेली होती.दिलीपने सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु तो मंजूर होण्याआधीच त्याचा खून झाला. त्यानंतर त्याच्या विधवा पत्नीने वारसा प्रमाणपत्र व मालमत्तेतील ह्श्श्यिासाठी उच्च न्यायालयात केलेला दावाही प्रलंबित होता. त्यामुळे दिलीपचे नेमके वारस कोण व विम्याची रक्कम कोणाला देय आहे, याविषयी संदिग्धता हे विमा कंपनीने नकार देण्याचे एक कारण होते. परंतु दिलीपची विधवा पत्नी नोटीस काढूनही ग्राहक न्यायालयात आली नाही. त्याच्या वडिलांनी, दोन भावांनी व दोन बहिणींनी या विम्याच्या रकेमत आम्हाला काही वाटा नको, अशी प्रतिज्ञापत्रे केली. त्यामुळे ग्राहक न्यायालयाने दिलीपच्या आईलाच एकमेव वारस मानून विम्याची सर्व रक्कम तिला देण्याचा निकाल दिला. (विशेष प्रतिनिधी)