शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

आॅर्डर... आॅर्डर...आॅर्डर! तरुणांची ‘गांधीगिरी’ सुरू

By admin | Updated: January 11, 2016 15:11 IST

अंकित जाधव हा बारावीतील तरुण, सुहास ठाकूर बी. कॉमचा विद्यार्थी, मिलिंद मोरे हा चांगल्या कंपनीत नोकरी करणारा युवक आणि अमित अडखळे हा बी.ए.चा विद्यार्थी हातात झाडू

ठाणे : अंकित जाधव हा बारावीतील तरुण, सुहास ठाकूर बी. कॉमचा विद्यार्थी, मिलिंद मोरे हा चांगल्या कंपनीत नोकरी करणारा युवक आणि अमित अडखळे हा बी.ए.चा विद्यार्थी हातात झाडू घेऊन टेकडी बंगला परिसरात साफसफाई करीत आहेत... त्यांच्या मित्र परिवारातील मंडळी खालमानेने ही गांधीगिरी पाहत आहेत... नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस या तरुणांच्या सफाईवर लक्ष ठेवून आहेत... आणि शेकडो बघे येताजाता या घटनेची चौकशी करीत आहेत, हे दृश्य रविवारी येथे दिसले.दसरा मिरवणुकीत मद्यधुंद अवस्थेत सहभागी झालेल्या या तरुणांवर गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या तरुणांनी तक्रारदार महिलेशी सामंजस्याने हा वाद सोडवला. मात्र, हा गुन्हा रद्द करवून घेण्याकरिता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा न्यायालयाने गुन्हा जरी रद्द केला तरी पुन्हा असा प्रकार त्यांच्या हातून घडू नये व अन्य तरुणांनाही धडा मिळावा, याकरिता या चौघांना पुढील सहा महिने दर रविवारी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी चार तास रस्त्यावर साफसफाई करण्याची हटके शिक्षा ठोठावली. न्यायालयाचा निकाल गुरुवार, ७ जानेवारीला आल्यानंतर हा पहिलाच रविवार. त्यामुळे जाधव, ठाकूर, मोरे व अडखळे हे तरुण हातात झाडू घेऊन रस्त्यावर साफसफाई करीत होते. त्यांची मित्र मंडळी न्यायालयाच्या आदेशावरून करावी लागलेली गांधीगिरी पाहत होते. नौपाडा पोलीस ठाण्याचे या प्रकरणातील तपास अधिकारी लोंढे आणि एक हवालदार आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहत मागोमाग चालत होते. त्यांची छायाचित्रे काढणाऱ्यांना ते आणि त्यांचे मित्र छायाचित्रे न काढण्यासाठी विनवत होते.