शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल फॅक्टरीत मोठ्या स्फोटाच्या शक्यतेने लगतचे वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 13:09 IST

घटनेतील मृताची संख्या ११, जखमींची संख्या ४० पेक्षा जास्त

धुळे- जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावालगत असलेल्या येथे एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ११ जण ठार तर सुमारे ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. वाघाडी-बाळदे रस्त्यावरील फॅक्टरीत झालेल्या या स्फोटाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. फॅक्टरी जमिनीखाली असलेल्या टाकीचा मोठा स्फोट होण्याच्या शक्यतेने फॅक्टरीलगत असलेले वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान घातपाताच्या शक्यतेने एटीएसचे पथक घटनास्थळी पोहचले असून नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन शिरपूर नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.मृत्यू झालेल्या सात जणांपैकी पाच जणांची ओळख पटली असून, दोन जणांची ओळख पटलेली नाही. त्यात एक पुरूष व एका मुलीचा समावेश आहे. तर सुमारे ४० जण जखमी झाले आहेत.या स्फोटाच्या घटनेची झळ वाघाडी गावाला बसली असून फॅक्टरीत मोठा स्फोट होण्याच्या शक्यतेने हे गाव खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यामुळे तेथील रहिवाशी ग्रामस्थांना अन्य सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. घटनेच्या ठिकाणी धुळे, शिरपूर व शहादा अग्निशमन बंब पोहचले असून फॅक्टरी परिसर व फॅक्टरीत स्फोटामुळे जळालेल्या साहित्यावर तसेच आग लागलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यात येत आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे येथील उपसंचालक एम.एम. रत्नपारखी तातडीने घटनास्थळी पोहचले. परिस्थितीचा आढावा घेऊन उपाय योजले जात आहेत. अजून फॅक्टरीत मोठा स्फोट होण्याच्या शक्यतेने वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश देण्यात आले. त्याची तत्परतेने अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी जमिनीखाली असलेल्या टाकीचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यात अडथळे येत आहेत. तरी नागरिकांनी रस्त्यावर व घटनास्थळ परिसरात येऊन गर्दी करू नये. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घरातच थांबावे, असे आवाहन शिरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.