पूजा दामले, मुंबईपॅथॉलॉजी लॅब चालवण्यास कोणास परवानगी आहे आणि कोणास परवानगी नाही, याविषयी १० आॅक्टोबर २००७ रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिले. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या आदेशांची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) सर्रास पायमल्ली करीत आहे.न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे लिहिले आहे, की डीएमएलटी आणि तत्सम शिक्षणधारक पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. न्यायालयाच्या आदेशाचे सोईनुसार अर्थ काढून डीएमईआरकडून कारवाईत दिरंगाई केली जात आहे. डीएमईआर कार्यालयातून निर्गमित झालेल्या एकाच पत्रात स्वतंत्ररीत्या लॅब चालवणाऱ्या डीएमएलटीधारकांवर कारवाई करा आणि त्याच पत्रात खालच्या उताऱ्यात कारवाई करू नका, असे विरोधाभास निर्माण करणारे आदेश देण्यात आले आहेत. डीएमएलटी आणि तत्सम प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्यास त्यांच्यावर बोगस डॉक्टरवर ज्या कायद्यांतर्गत कारवाई होते, त्याद्वारेच कारवाई होते, असे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे म्हणणे आहे. परंतु डीएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांच्या म्हणण्यानुसार, डीएमएलटी अथवा तत्सम शिक्षण घेतलेल्या व्यक्ती मशिनद्वारे आलेला रिपोर्ट रुग्णाला देऊ शकतात. नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे अनेक तपासण्यांचे रिपोर्ट मशिनद्वारे येतात. त्यामुळे हिमोग्लोबिनची तपासणी केल्यावर हिमोग्लोबिन ६ अथवा ७ आल्यास तो रिपोर्ट देऊ शकतो. पण त्यावर अॅनिमिया असे नमूद करू शकत नाही. मशिनमधून येणारे रिपोर्ट देण्यास परवानगी असल्याचा निष्कर्ष डॉ. शिनगारे यांनी काढला आहे.
डीएमईआरकडून आदेशांची पायमल्ली
By admin | Updated: April 8, 2015 01:56 IST