शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील बालमृत्युंच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 20, 2016 05:41 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचे सत्य उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग हादरला आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बालमृत्यूचे सत्य उघडकीस आल्यानंतर जिल्हा आरोग्य विभाग हादरला आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी नागपूर येथील आरोग्य उपसंचालकांना या बालमृत्युंची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.‘लोकमत’ने दि. १८ जुलै रोजी ‘चंद्रपुरात मेळघाटपेक्षाही अधिक बालमृत्यू’ या मथळ्याखाली वृत्त प्र्रकाशित केले होते. सौनिक यांनी त्याची दखल घेऊन नागपूर येथील आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना ई-मेलद्वारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सौनिक यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या भागात बालमृत्यू अधिक आहेत, त्याची कारणे काय, बालमृत्यू कमी करण्याकरिता कोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहेत, शासकीय योजनांची स्थिती काय आदी माहिती तातडीने मागितली आहे. याशिवाय, गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्याकरिता १०२ वाहनांचा उपयोग केला जातो काय, अशीही विचारणा केली आहे. माहेरघर योजनेचा लाभ महिलांना व्यवस्थित दिला जातो काय, याबाबतही प्रधान सचिवांनी माहिती बोलाविली असून, चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय करून आरोग्य विभागाने बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचे आदेशही दिले आहेत.चंद्रपूरचा बालमृत्युदर ३.२२जिल्हा आरोग्य विभागानुसार, चंद्रपूर जिल्ह्यात २२ लाख ७१ हजार ६७६ लोकसंख्येत ४६५ बालमृत्यू आहेत, तर मेळघाटात केवळ दोन तालुक्यांतील २ लाख ९४ हजार १३७ लोकसंख्येमध्ये ४४६ बालमृत्यू आहेत. त्यामुळे मेळघाटच्या बालमृत्यूचे प्रमाण चंद्रपूरच्या चारपटीपेक्षा अधिक असून, जिल्ह्याचा दरहजारी बालमृत्युदर ३.३२ आहे, असेही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.