शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

१० टप्प्यांत होणार ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’

By admin | Updated: August 26, 2014 01:06 IST

मेट्रो रेल्वे, पारडी उड्डाणपूल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिंपूजन केल्यानंतर, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वर्धा रोड ते जयताळादरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’

लवकरच निविदा : साडेचार वर्षांत साकारणार नागपूर : मेट्रो रेल्वे, पारडी उड्डाणपूल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिंपूजन केल्यानंतर, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वर्धा रोड ते जयताळादरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. दहा टप्प्यात या प्रकल्पाचे काम केले जाईल. यासाठी साडेचार वर्षे लागतील. लवकरच यासाठी निविदा जारी केल्या जातील. त्यामुळे या प्रकल्पाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रकल्पासाठी निविदा काढण्यापासून ते प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’चा प्रस्ताव ठेवण्यात आला. या योजनेचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या आधारावर प्रकल्प साकारला जाईल. मौजा सोमलवाडा, खामला भामटी, टाकळी व जयताळा येथील ३१.१५ हेक्टर जमिनीचा महापालिकेला ताबा मिळाला आहे. यातील काही जमीन संरक्षण विभागाची आहे. प्रकल्पाचा अहवाल आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केला आहे. हा प्रकल्प ५.५० किलोमीटर लांब व ३६ ते १०० मीटर रुंद जागेवर साकारला जाईल. प्रकल्पांतर्गत वाणिज्यिक, निवासी, सामाजिक, शैक्षणिक व कार्यालयीन उपयोगासाठी सुविधा विकसित केल्या जातील. महापालिकेचे अधीक्षक अभियंता उराडे यांनी सांगितले की, संबंधित प्रकल्प प्राथमिकस्तरावर आहे. याचा डीपीआर तयार करून वेगवेगळ्या मुद्यांवर प्रकाश टाकला जाईल; कायदेशीर सल्लादेखील घेतला जाईल. (प्रतिनिधी)असा साकारणार प्रकल्प दहा टप्प्यात या प्रकल्पाचा विकास केला जाईल. पहिल्या टप्प्यात हॉस्पिटॅलिटी, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात निवासी, चौथ्या व पाचव्या टप्प्यात हॉस्पिटल व निवासी सुविधा, सहाव्या टप्प्यात महापालिकेतर्फे विविध विकास कामे, सातव्या टप्प्यात निवासी तसेच शेवटच्या तीन टप्प्यात वाणिज्यिक, कार्यालयीन व कन्व्हेन्शन सेंटर आदीचे काम केले जाईल, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.४,६२७ कोटींचा खर्च बोरकर यांच्यानुसार प्रकल्पासाठी ४,६२७ कोटी रुपयांचा खर्च येईल. यापासून ५,३०७ कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यापासून महापालिकेला साडेचार वर्षांत ६५४.५० कोटींचे उत्पन्न मिळेल. याशिवाय सार्वजनिक हिताच्या विकास कामांसाठी १३२.२३ कोटी व इतर विकास कामांवर ७८.२७ कोटी रुपये खर्च केले जातील.