शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

..तर अडीच लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 00:10 IST

परभणी जिल्ह्यात २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार परभणी जिल्ह्यात २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.राज्यातील ५ एकरपर्यंत शेत जमीन असलेल्या अल्पभूधारक आणि थकित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून रोजी केली आहे. तसेच ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी अंमलात आणली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनुसार परभणी जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यात एकूण ३ लाख ४७ हजार ९१८ शेतकरी आहेत. त्यापैकी ० ते १ हेक्टर जमीन असलेले १ लाख ३० हजार ७४ शेतकरी असून १ ते २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख २६ हजार ९२७ एवढी आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ५७ हजार एवढी असून ९० हजार ९१७ शेतकरी बहुभूधारक आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे अडीच लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यातील ८४८ गावांमधून शेतकऱ्यांनी खरीप व रबीच्या पेरण्यांसाठी बँकेमार्फत पीक कर्ज घेतले आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या उपलब्ध असली तरी या शेतकऱ्यांनी किती रुपयांचे कर्ज घेतले आणि कर्जमाफीची रक्कम किती होते, याचा लेखाजोखा तयार करण्याचे काम बँक प्रशासनामार्फत केले जात आहे. एकंदर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो, हे मात्र स्पष्ट झाले आहे.