शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांची एकजूट

By admin | Updated: March 11, 2016 04:07 IST

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज संपूर्णत: माफ करण्याची एकमुखी मागणी विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केली. दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले

मुंबई : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे पीककर्ज संपूर्णत: माफ करण्याची एकमुखी मागणी विरोधी पक्षांनी आज विधानसभेत केली. दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले असून, केंद्रीय मदतीबाबतही राज्याची दिशाभूल केली जात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत नियम २९३नुसार उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला दुष्काळाचे गांभीर्यच कळले नसल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आत्महत्याग्रस्त भागात शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आली असल्याचे सरकार सांगते. खरेतर, सरकारलाच समुपदेशनाची गरज आहे. चारा छावण्या बंद करणाऱ्या सरकारला काय लावण्या सुरू करायच्या आहेत काय? मंत्र्यांनी मराठवाड्याचा दौरा केला. पण या दुष्काळ दौऱ्याने काय साध्य केले. मुंबईत ज्याघोषणा करता आल्या असत्या त्या तेथे जाऊन केल्या. आपल्या चुकांचे परिमार्जन जर सरकारला करायचे असेल तर संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील म्हणाले की, नापिकी आणि कर्जापायी २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातील बहुतेकांवर १ लाख रुपयांपेक्षाही कमी कर्ज होते. सरकारने तिजोरी जराशी उघडून कर्जमाफी दिली असती तर या आत्महत्या टळल्या असत्या. केंद्रीय मदतीबाबतही राज्य शासन दिशाभूल करीत आहे. केंद्राने ३ हजार कोटी रुपये दिलेलेच नाहीत. केवळ ६५० कोटी रुपये दिले आहेत, असा दावा त्यांनी केला.या चर्चेत अब्दुल सत्तार, भीमराव धोंडे, डॉ. अनिल बोंडे, मधुकरराव चव्हाण आदी सदस्यांनी भाग घेतला. दुष्काळावरील चर्चा उद्याही होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)विधवांना पेन्शन देण्याची अजित पवारांची मागणीदुष्काळासारख्या गंभीर मुद्द्यावर आम्ही पोटतिडकीने बोलत असताना मुख्यमंत्री, महसूलमंत्री सभागृहात नाहीत. अशा मुद्द्यावरही मंत्री उपस्थित राहत नसतील तर आम्ही इथे गोट्या खेळायला आहोत काय, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. बळीराजा उद्ध्वस्त झाला तर सरकारही उद्ध्वस्त होईल, असा इशारा पवार यांनी दिला. संजय गांधी निराधार योजनेप्रमाणे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला महिन्याला ३ हजार रुपये पेन्शन सुरू करा, अशी मागणीही पवार यांनी केली.