लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन टीजेएसबी बँकेतून होणार आहे. मात्र, ते शिक्षकांच्या गैरसोयीचे असल्यामुळे ठाणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाने टीजेएसबीतील वेतनाला नापसंती दर्शवली आहे. जुलैचे वेतनही टीडीसीतूनच होणार आहे. मात्र, आॅगस्टपासून ते टीजेएसबीतूनच करण्याचे निश्चित झाले आहे. याविरोधात शिक्षक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली असून १७ जुलै रोजी सुनावणी आहे.
‘टीजेएसबी’तील वेतनाला मुख्याध्यापक संघाचा विरोध
By admin | Updated: July 11, 2017 04:13 IST