मालवण : पर्ससीननेट मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी न्यायालयीन लढा सुरू केला असून, या लढय़ातील कायदेशीर बाजूंची पडताळणी करण्यात येईल. तसेच दोन्ही बाजूंच्या मच्छीमारांना घेऊन मार्ग काढला जाईल, असे सांगतानाच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीननेट मासेमारीला आपला विरोध राहील, अशी स्पष्टोक्ती उद्योगमंत्री नारायण राणो यांनी येथे बुधवारी दिली.
येथील नीलरत्न निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नारायण राणो बोलत होते. ते म्हणाले, ‘पर्ससीननेट मासेमारीच्या पद्धतीमुळे समुद्रातील मासेमारीवर होणारे परिणाम’ याविषयी डॉ. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारने अद्याप चर्चेसाठी खुला केलेला नाही.
यासंदर्भात तज्ज्ञांची मते जाणून निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीननेट मासेमारीला बंदी आहे. याला आपला विरोधच राहील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जमीनधारकांना योग्य मोबदला
शिवसेनेकडून ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाबाबत बोलताना राणो म्हणाले, ‘सी-वर्ल्ड’ला विरोध करणा:या शिवसेना, भाजपावाल्यांनी एकतरी रोजगार जिल्ह्यात आणला आहे का? राज्यात काँग्रेसची सत्ता असेर्पयत कोणीही एक व्यक्ती ‘सी-वर्ल्ड’ बंद करू शकत नाही. तेथील जमीनधारकांना योग्य तो मोबदला देऊनच ‘सी-वर्ल्ड’साठी भू-संपादन करण्यात येणार असल्याचे राणो म्हणाले.