आधी पॅकेज नंतर कामकाज : विधिमंडळ परिसरात जोरदार नारेबाजी
नागपूर : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी. यासाठी आक्रमक भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी विधिमंडळ परिसरात मोर्चा काढला.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे सदस्य मोर्चाने आले. शेतक:यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पॅकेजची घोषणा करावी, आत्महत्यांचा मेळ नाही मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. अशा घोषणा देत होते. यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, धनंजय मुंडे, विद्या चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या सदस्यांचा समावेश होता.
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतक:यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्या थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. आधी पॅकेजची घोषणा नंतरच चर्चा, त्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.
राज्यातील 19 हजाराहून अधिक गावांत दुष्काळी परिस्थिती आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यांनी पॅकेज मंजूर करून घोषणा करायला हवी. यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार नारेबाजी करीत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली.
विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते राधाकृ ष्ण विखे-पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, सुनील तटकरे,वीरेंद्र जगताप, राजेंद्र जैन, विद्या चव्हाण, धनंजय मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. (प्रतिनिधी)
स्वस्थ बसणार नाही
शेतकरी संकटात असल्याने सरकारने आधी पॅकेजची घोषणा करावी व नंतर चर्चा घ्यावी, त्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. शेतक:यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका राधाकृ ष्ण विखे-पाटील यांनी मांडली.
दोन हजार कोटी फारच कमी
राज्यात भीषण दुष्काळ आहे. संकटग्रस्त शेक:यांना मदत करण्यासाठी दोन हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आहे. तितकीच मदत शेतक:यांना देण्याचा सरकारचा विचार आहे. परंतु ही रक्कम तुटपुंजी असल्याचे सुनील तटकरे म्ह्णाले.
विरोधकांत एकजूट
अधिवेशनाच्या दुस:या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पॅके जच्या मुद्यावर एकजूट झाल्याचे चित्र बघायला मिळाले. जनतेच्या प्रश्नावर एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात दुष्काळी स्थिती आहे. अधिवेशनात पॅकेजची घोषणा होईल, अशी शेतक:यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आधी पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी केली. परंतु सरकार यावर चर्चा करीत नसल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.