शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीला समाजाचा विरोध चुकीचा; छावा संघटनची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 02:34 IST

आंदोलनात एमपीएससी परीक्षेला विरोध होत आहे. मात्र हा विरोध चुकीचा असून, समाज बांधवांनी एमपीएससी परीक्षेला विरोध करू नये, अशी भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी घेतली.

लातूर/पुणे : मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगळ्या स्तरावर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात एमपीएससी परीक्षेला विरोध होत आहे. मात्र हा विरोध चुकीचा असून, समाज बांधवांनी एमपीएससी परीक्षेला विरोध करू नये, अशी भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी घेतली.छावा संघटनेची बैठक गुरुवारी लातूर येथे झाली. मराठा समाजाने दुसऱ्या समाजावर अन्याय करून आम्हाला आमच्या मागण्या मान्य करा, असे कधीही म्हटलेले नाही. हा समाज कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन वाटचाल करणारा समाज आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेला विरोध करणे चुकीचे आहे. इतर जाती-धर्मातील विद्यार्थ्यांचे नुकसान तसेच मराठा समाजातील उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचेही यात नुकसान आहे. त्यामुळे परीक्षेला विरोध करू नये. सरकारच्या नोकरभरतीला विरोध करावा, असे जावळे यांनी म्हटले आहे.संभाजीराजेंची भूमिका दुटप्पी;संभाजी ब्रिगेडचा आरोपराज्यसभेत २०१८ मध्ये मंजूर झालेल्या १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे मागासवर्ग आयोगाच्या कायद्याने आरक्षणासाठी नवे प्रवर्ग तयार करण्याचे राज्यांचे अधिकार रद्दबातल ठरले. या घटना दुरुस्तीला भाजपचे खासदार युवराज संभाजीराजे यांनी पाठिंबा दिला होता.तेच संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांसमोर जाऊन आर्थिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) मराठा आरक्षणाची मागणी करण्याचा दुटप्पीपणा करत आहेत. संसदेत एक भूमिका आणि समाजासमोर त्याच्या विरोधी भूमिका म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. घटनेच्या चौकटीत बसणारे ईडब्लूएसचे आरक्षण मिळावे हा आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा