शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते मराठवाड्याच्या दौऱ्यावर

By admin | Updated: September 9, 2015 00:38 IST

मराठवाड्यातील दुष्काळी कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दि. ९ सप्टेंबरला लातूर,

मुंबई : मराठवाड्यातील दुष्काळी कामांची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात दि. ९ सप्टेंबरला लातूर, १० सप्टेंबरला परभणी जिल्ह्याचा ते दौरा करणार आहेत.९ सप्टेंबर सकाळी ९ वाजता त्यांचे लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी १० वाजता ते लातूर तालुक्यातील मौजे साखरा येथे, तर सकाळी ११.१५ वाजता रेणापूर तालुक्यातील मौजे निवाडा येथे दुष्काळी भागाची पाहणी करतील. दुपारी १२.१५ वाजता ते रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता लातूर मनपाच्या सभागृहात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेतील. दुसऱ्या दिवशी दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ते परभणी तालुक्यातील इंदेवाडी येथे दुष्काळी भागाची पाहणी करतील. सकाळी ११.३० वाजता याच तालुक्यातील साळापुरी येथील आत्महत्या करणारे शेतकरी गुलाबराव घाडगे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. दुपारी १२.१५ वाजता ते दैठणा तर दुपारी १ वाजता पोखर्णी नृसिंह येथे दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. दुपारी २ वाजता विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेईल व दुष्काळी कामांसंदर्भात निवेदन सादर करेल.