शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर ठरविणार विरोधी पक्षनेता

By admin | Updated: March 12, 2017 00:16 IST

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधकांच्या बाकावर बसण्यास भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधकांच्या बाकावर बसण्यास भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे, परंतु भाजपा आपण हक्क सोडत असल्याचे लिहून देत नसल्याने या पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय आता महापौर विश्वनाथ महाडेश्वर शुक्रवारी होणाऱ्या महासभेत जाहीर करतील.भाजपाने ‘यू टर्न’ घेत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. मात्र सत्तेत सहभागी नसल्याने महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष म्हणून भाजपाच विरोधी पक्ष ठरतो. नियमाप्रमाणे या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेता जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून महापालिकेत काम करणार, असे जाहीर करणाऱ्या भाजपाला विरोधी पक्षात बसायची इच्छा नाही. परंतु असे लेखी चिटणीस खात्याला कळविण्यास भाजपा तयार नसल्याने विरोधी पक्ष कोण, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे चिटणीस खात्यामार्फत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. त्यानंतर शुक्रवारच्या पहिल्या महासभेत महापौर विरोधी पक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. (प्रतिनिधी)काँग्रेसचा युक्तिवादमहापौर व उपमहापौरपदासाठी शिवसेना उमेदवारांना भाजपाने मतदान केल्याने पालिका कायदा १८८८ कलम ३७-१ अ मधील नियमानुसार काँग्रेस हाच विरोधी पक्ष ठरतो, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांचा गटनेता हाच विरोधी पक्षनेता ठरतो, असा युक्तिवाद काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी चिटणीस खात्याला पाठविलेल्या पत्रातून मांडला आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाजपाच विरोधी पक्षभाजपाने विरोधी पक्ष बनण्यास नकार दिला, तरी पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून आपले नगरसेवक काम करतील, असे भाजपाने जाहीर केले आहे. जनतेच्या हिताच्या प्रस्तावांवरच शिवसेनेला समर्थन देणार, अन्यथा आक्षेप घेऊ, असे जाहीर करून भाजपाने आपले इरादे आधीच स्पष्ट केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर भाजपा बसो अथवा न बसो, भाजपाच विरोधकाची भूमिका बजावणार हे निश्चित आहे.