शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केरळातील हत्यांना विरोध

By admin | Updated: March 2, 2017 00:49 IST

केरळमध्ये मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे निर्घृण हत्याकांड चालविले

पुणे : केरळमध्ये मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचे निर्घृण हत्याकांड चालविले असून, त्याला तेथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे केरळमधील कम्युनिस्ट विचारांचे सरकार बरखास्त करून, राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली. या हत्यांचा निषेध करण्यासाठी बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धिक्कार सभेचे आयोजन करण्यात आले होते. केरळमधील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरील हल्ल्याविरोधात संघाने देशव्यापी निदर्शने केली. त्या पाठोपाठ हे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, योगेश मुळीक, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, स्वरूपवर्धिनीचे सागर शिंदे, भारत-भारतीचे चरणजित सहानी, छावा संघटनेचे धनंजय जाधव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बागेश्री मंठाळकर, हिंदू सेवा समितीचे रमेशजी आणि भारतीय मजदूर संघाचे उदय पटवर्धन या वेळी उपस्थित होते. केरळमध्ये माकपचे कार्यकर्ते इतर पक्ष-संघटनांना कामच करू देत नाहीत. कन्नुर जिल्ह्यात गेल्या ८ महिन्यांत १८ संघ कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. मार्क्सवादी कार्यकर्ते संघ कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक करतात, तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा आरोप केरळचे भारत-भारतीचे कार्यकर्ते रमेश कळंबोली यांनी या वेळी केला. >विचारांना विचारानेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. तलवार, बंदुकीने विचार कधीच मरत नाहीत. कम्युनिस्ट पक्षानेही आपले विचार जरूर मांडावेत; मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संघ-भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. त्यामुळे केरळमध्ये भय आणि दहशतीचे वातावरण आहे. -गिरीश बापट, पालकमंत्री केरळमधील हिंसाचार जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. तेथील हिंसाचाराच्या घटनांवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह स्वत: लक्ष ठेवून आहेत; तसेच मानवाधिकार आयोगानेही तेथील परिस्थितीचा अहवाल मागविला आहे. ‘काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे’ अशी खंत उदय पटवर्धन यांनी व्यक्त केली. - अनिल शिरोळे, खासदार