शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी-दिल्ली कॉरिडोरला सरावली येथील सभेत विरोध

By admin | Updated: February 27, 2017 03:11 IST

बागायतदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीतून नेऊन त्यांना विस्थापित करण्याच्या रेल्वेच्या धोरणाला बागायतदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

शौकत शेख,डहाणू- पश्चिम रेल्वेच्या वाणगाव, डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या हजारो एकर सरकारी जागेतून सरळ मार्गाने रेल्वे न नेता ती पूर्वेकडील गावांतून तब्बल दोन कि.मी. अंतरावरील शेकडो बागायतदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीतून नेऊन त्यांना विस्थापित करण्याच्या रेल्वेच्या धोरणाला बागायतदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. जेएनपीटी - दिल्ली या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांना कोणताही मोबादला न देता सरकार आणि रेल्वे प्रशासन मनमानी पद्धतीने जमिनी देण्याची सक्ती करीत आहे. त्याविरूद्ध प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रविवारी सरावली येथे रेल्वे कॉरीडोअर विरोधी समिती स्थापन केली. काही बागायतदारांनी एक संयुक्त सभा घेऊन या विरोधात न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.डहाणू ते घोलवड दरम्यान अल्प भूधारकांच्या जमिनी असून सरकारने त्यांना कवडीमोल मोबदला देण्याचे धोरण ठरवल्याने त्याविरोधात शेतकरी पेटून उठले आहेत. आम्हाला पुरेशा प्रमाणात जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकरी, बागायदार, ग्रामस्थांनी घेतली आहे. येथील मोठ मोठ्या बागायत वाडीतून ही रेल्वे जाणार असल्याने या वाड्यांचे दोन ते चार भाग होणार असून त्याविरोधात रिट पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश गांधी , डहाणूचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, कॉरीडोर विरोधी समितीचे रवि फाटक, धनसुख माच्छी, विष्णू माच्छी, वेस्ता माच्छी यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.