शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या पाकीटबंद खाऊला विरोध, आज देशव्यापी आंदोलनाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 02:15 IST

आयसीडीएस योजनेत थेट रोख रक्कम हस्तांतरण व अंगणवाड्यांमध्ये पाकीटबंद आहाराचे वितरण करण्याला अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनने (आयफा) विरोध केला आहे.

मुंबई : आयसीडीएस योजनेत थेट रोख रक्कम हस्तांतरण व अंगणवाड्यांमध्ये पाकीटबंद आहाराचे वितरण करण्याला अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनने (आयफा) विरोध केला आहे. शिवाय सरकारच्या निर्णयाविरोधात २२ व २३ सप्टेंबर रोजी देशभरात निषेध आंदोलनाची हाक दिली आहे.आयफाच्या महासचिव ए.आर. सिंधू यांनी सांगितले की, देशभरात निषेध आंदोलन करत सरकारचे प्रतीकात्मक पुतळेही जाळण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपालाही आयफाने पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने ताजा गरम आहार बंद करून खाण्यासाठी तयार कोरडा पाकीटबंद आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र अनेक अहवाल व अभ्यासांमधून कुपोषण निर्मूलनातील हा आहार उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आले आहे. याउलट अंगणवाडीच्या योगदानाकडे शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. याशिवाय ३०० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लाभार्थ्यांच्या खात्यात रोख रकमेचे हस्तांतरण करण्याची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. या निर्णयाचाही आयफाने निषेध केला आहे. आयफाच्या म्हणण्यानुसार, वर्षानुवर्षे झोकून देऊन काम करणाºया देशातील २६ लाख महिलांच्या रोजगारावर यामुळे गदा येणार आहे.>पोषण आहार वाटण्यास आशा वर्करचा नकारअंगणवाडी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे राज्य शासनाने बुधवारी रात्री पोषण आहार वाटपाचे काम आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांकडे सोपवले आहे. मात्र आशा आणि गटप्रवर्तकांच्या महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स फेडरेशनने पोषण आहार वाटपाचे काम करण्यास गुरुवारी नकार दिला. अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा देत आंदोलनात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.