शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीत पीडित मुलीचे स्मारक बांधण्यास विरोध

By admin | Updated: July 13, 2017 01:05 IST

कोपर्डी येथे पीडित मुलीचे स्मारक बांधण्याच्या भय्यूमहाराज यांच्या घोषणेचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोपर्डी येथे पीडित मुलीचे स्मारक बांधण्याच्या भय्यूमहाराज यांच्या घोषणेचा संभाजी ब्रिगेडने निषेध केला असून, बलात्कार आणि हत्या प्रकरणाला उद्या १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण होत असताना, न्याय न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिगेडचे राज्यभरातील कार्यकर्ते कोपर्डी येथे उपस्थित राहणार आहेत. संभाजी ब्रिगेडने ही माहिती बुधवारी कळविली.विकास पासलकर, प्रशांत धुमाळ, हर्षवर्धन मगदूम, मयूर शिरोळे, प्रदीप तांबे, अजय भोसले, सागर आल्हाट आदींनी या संदर्भातील निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे. नराधमांना शिक्षा होणे अपेक्षित असताना त्यासाठी संघर्ष न करता समाजाला दुखावणाऱ्या घटनेचे उदात्तीकरण करणे खेदाचे आहे, असे या निवेदनात म्हटले असून, मराठा क्रांती मोर्चाचे श्रेय घेण्याच्या नादात स्मारकासाठी अट्टहास करणाऱ्या भय्यू महाराज यांचे मनसुबे उधळून लावले जातील. प्रसिद्धीसाठी त्यांनी स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या घटनेचे राजकारण करू नये; अन्यथा संभाजी ब्रिगेडचा संघर्ष अटळ आहे, असे म्हटले आहे. स्मारक पराक्रम, शौर्याचे प्रतीक असते. समाजाची मान उंचावणारे असते. कोपर्डी येथील मुलीसोबत झालेली घटना अमानवी होती. ती समाजाची मान खाली घालायला लावणारी आहे. त्यामुळे संतप्त समाजाने राज्यभरात मोर्चे काढले. समाजाच्या भावना आजही संतप्त असताना देशमुख चुकीची कल्पना राबवू पाहत आहेत. हा प्रकार समाज खपवून घेणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.