शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘बाजीराव मस्तानी’, ‘दिलवाले’ला विरोध

By admin | Updated: December 19, 2015 03:52 IST

बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन्ही बिगबजेट चित्रपटांना प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. भाजपाने ‘बाजीराव मस्तानी’ला तर

- शिवसेना-भाजपा मैदानात

मुंबई : बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन्ही बिगबजेट चित्रपटांना प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. भाजपाने ‘बाजीराव मस्तानी’ला तर, शिवसेनेने ‘दिलवाले’विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले.थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबीयांचे विकृत चित्रीकरण केल्याचा आक्षेप घेत भाजपा कार्यकर्त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’च्या विरोधात शुक्रवारी पुण्यातील काही चित्रपटगृहांसमोर आंदोलन केले. त्यामुळे, कोथरूडमधील सिटी प्राईडमधील या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. तर, मंगला चित्रपटगृहासमोरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून चित्रपटाचे पोस्टर फाडले. मात्र, तेथे पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचे शो झाले. संजय लीला भन्साळी यांनी चुकीचा इतिहास दाखविल्याबद्दल ‘बाजीराव मस्तानी’ला कोल्हापुरात पतित पावन संघटनेनेही विरोध केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पार्वती मल्टिप्लेक्स व पद्मा टॉकीज या चित्रपटगृहांबाहेर निदर्शने केली. पद्मा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने दुपारी साडेबारा वाजता होणारा पहिला खेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.उस्मानाबाद, जालन्यात ‘दिलवाले’ला विरोधअसहिष्णूतेच्या मुद्यावर अभिनेता शाहरूख खानचा निषेध करीत उस्मानाबाद, जालना तसेच नंदुरबारमध्ये ‘दिलवाले’ला जोरदार विरोध करण्यात आला. तिन्ही ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द झाले.उस्मानाबाद शहरातील श्री टॉकीजच्या बाहेर शिवसेना, युवा सेना, महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाहरूख खान, आमीर खानच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत चित्रपटाचे पोस्टर फाडून टाकले़ शिवसैनिकांची आक्रमक भूमिका पाहता व्यवस्थापनाने ‘शो’ रद्द केले़ तर, जालन्यात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने ‘दिलवाले’चे तिनही शो रद्द करून चित्रपटगृहासमोर लावलेले पोस्टरही व्यवस्थापनाने काढले.नंदुरबारमध्ये शिवसेनेने ‘दिलवाले’च्या विरोधात चित्रपटगृह मालकाला निवेदन दिले होते. त्याची दखल घेत चित्रपटगृह चालकांनी या चित्रपटाचा शो रद्द केला.