शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘जय विदर्भ’ला विरोध का?

By admin | Updated: November 12, 2014 01:02 IST

विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला

सेनेविरुद्ध संताप : विदर्भाचा जयजयकार केला तर बिघडले कुठे?

नागपूर: विदर्भाचा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वतंत्र राज्याच्या संकल्पनेला मूर्त रूप येईल, अशी वैदर्भीय जनतेची सार्वत्रिक इच्छा असताना या भागातील आमदारांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला म्हणून शिवसेनेने आक्षेप घेणे आणि त्यानंतर आमदारांना तंबी देणे याच्या संतप्त प्रतिक्रिया विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच भाजपने या मुद्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करून विदर्भाचा आवाज अधिक बुलंद करावा, अशी मागणी होत आहे.भाजपने सुुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मुद्यावर मतेही मागितली. जनतेनेही त्यांना कौल दिला. त्यामुळे भाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आल्यावर लोकांच्या स्वतंत्र राज्याविषयी अपेक्षा वाढल्या आहेत. त्याचेच प्रतिबिंब म्हणून नागपूरमधील भाजपचे आमदार अनुक्रमे विकास कुंभारे, कृष्णा खोपडे आणि सुधाकर देशमुख यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र यामुळे राजकारण पेटले. शिवसेनेने त्यावर आक्षेप घेतल्याने त्याच्या तीव्र भावना विदर्भात उमटल्या आहेत. शिवसेनेच्या विदर्भ विरोधी भूमिकेचा भाजपचे नागपूरमधील आमदार आणि विदर्भवादी नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. यापूर्वीही नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात विदर्भातील अनेक आमदारांनी विविध प्रस्तावावरील चर्चे दरम्यान ‘जय विदर्भ’चा नारा दिला. मात्र त्यावेळी त्याला कोणी विरोध केला नाही. ‘जय विदर्भ ’म्हणणे हा गुन्हा आहे काय, असा सवाल करतानाच सेनेचा विरोध अनाकलनीय असल्याची भावना सामान्य जनतेत व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)जय विदर्भ म्हणणे घटनाविरोधी नाहीजय विदर्भचा नारा देणे घटना विरोधी किंवा नियमबाह्य नाही, विदर्भ हा महाराष्ट्राचाच भाग आहे. त्यामुळे शिवसेनेचा आक्षेप अयोग्य ठरतो. शिवसेनेचे सदस्यही ‘जय भवनी जय शिवाजी’ असा नारा देतातच. भवानी हे देवीचे नाव आहे. मग त्यावरही आक्षेप घ्यायचा काय. मी आमदार असताना अनेक वेळा जय विदर्भाचा नारा दिला आहे. वामनराव चटप, ज्येष्ठ विदर्भवादी व माजी आमदारहा तर व्यक्तिस्वातंत्र्यावर घालाघटनेच्या चौकटीत राहून प्रत्येकाला त्याच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमदार म्हणून विदर्भाचा नारा देणे चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकार आहे. शिवसेना ही काही राज्याची मालक नाही, कोणी काय बोलावे हे ठरविणारा हा पक्ष कोण ?. जय विदर्भ म्हणण्यावर आक्षेप घेणे म्हणजे आमदारांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे.राम नेवले, निमंत्रक,विदर्भ राज्य आंदोलन समिती