शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

२४ जानेवारीला ‘बुद्धिस्ट’ची शाखा घेण्याची संधी

By admin | Updated: January 22, 2016 03:36 IST

औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने राज्यभर शाखा देण्यात येत असून, यासाठी २४ जानेवारी रोजी शाखा देणे व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

चौका : औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने राज्यभर शाखा देण्यात येत असून, यासाठी २४ जानेवारी रोजी शाखा देणे व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल गेल्या दहा वर्षांपासून बौद्ध धम्मीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार उभा करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाखा उभारल्या जात आहेत. आतापर्यंत २३० शाखा कार्यरत असून, याचे जाळे राज्यभर निर्माण करण्यासाठी आणखी २७० शाखा देण्यात येणार आहेत.आज कोणत्याही ठिकाणी प्राथमिक शाळा उघडायची असेल, तर जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार स्वयंअर्थसाहाय्य प्रस्ताव दाखल करून शाळा मिळवावी लागते. सदरील पद्धत खर्चिक व किचकट असून ती सर्वसामान्य बौद्ध धम्मीयांना परवडणारी नाही, हे लक्षात घेऊन दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलने भारतीय घटनेच्या आर्टिकल ३० (१) अंतर्गत अल्पसंख्याकांना धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था काढण्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याअंतर्गत भारतातील पहिली शासन मान्यताप्राप्त बौद्ध धम्मीय शैक्षणिक संस्था काढण्यात आली असल्याचे ढाले यांनी सांगितले.यामार्फत प्रत्येक तालुक्यात बुद्धिस्ट पॅटर्न व सीबीएसई पॅटर्नची सांगड घालून बाबासाहेबांना अभिप्रेत असा बुद्धिस्ट अनुयायी घडविण्याचे काम चालू असल्याचेही ते म्हणाले.२३० शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. १२ वी उत्तीर्ण ते बी.एड., डी.एड, पदवीधारकांसाठी शिक्षकांची पदेही भरण्यात येत आहेत, तसेच बुद्धिस्ट शॉपीज, बुद्धिस्ट कॉलनीज, बुद्धिस्ट इंटरप्राईजेसद्वारेही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधी समजून घेण्यासाठी बुद्धिस्ट युवकांसाठी शिबीर आयोजित केले आहे.